Shocking Chandrapur । चंद्रपूर जिल्ह्यात घडली धक्कादायक घटना

January 17, 2026 by Prakash Hande

Big Shocking News Chandrapur : चंद्रपूर - भद्रावती तालुक्यातील मुरसा येथे एका ३६ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार, ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

कायद्याला न जुमानणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांचा हिसका

पिंकी मोरेश्वर कोडापे (वय ३६, रा. मुरसा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंकी यांनी घरगुती कामासाठी एका खाजगी मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची नियमित परतफेड न झाल्याने, कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना वारंवार त्रास दिला जात होता अशी चर्चा आहे.

 

दुहेरी त्रास

या त्रासासोबतच, त्यांचे पती काही कामधंदा करत नसल्याने त्यांच्यात नेहमीच वाद होत असत अशी माहिती समोर आली आहे. या दुहेरी त्रासाला कंटाळूनच पिंकी यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भद्रावती पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पिंकी यांच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे, याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

Leave a Comment

+