ब्रम्हपुरी तालुक्यात ट्रॅक्टर अपघात, २ ठार, ४ जखमी

January 17, 2026 by Prakash Hande

tractor crash deaths : ब्रम्हपुरी १५ जानेवारी : तालुक्यातील गोगाव-सायगाव मार्गावर गुरुवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. लाकूड कटाईचे काम करून परतत असताना ट्रॅक्टरचे एक्सल अचानक तुटल्याने वाहन ६-७ फूट खोल खड्ड्यात कोसळले. या दुर्घटनेत ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चार जण जखमी झाले आहेत. (चंद्रपुरात अपक्ष उमेदवाराच्या पतीला मारहाण)

 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गोगाव येथील सात मजूर ट्रॅक्टरने लाकूड तोडणीसाठी तळोधी येथे गेले होते. काम आटोपून दुपारी ३ वाजेच्या सुमारास सर्वजण घरी परतत असताना हा अपघात घडला. गोगाव-सायगाव रस्त्यावर चालत्या ट्रॅक्टरचे एक्सल अचानक तुटले. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॉलीसह ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन उलटला. tractor crash deaths

 

मृत व जखमींची नावे

या अपघातात ट्रॅक्टर आणि ट्रॉलीखाली दाबल्या गेल्याने खालील व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला:

  • प्रवीण प्रकाश भोयर (वय ३० वर्ष)
  • शिवाजी बळीराम दोडके (वय ५० वर्ष)

जखमींची माहिती: या अपघातात ब्रह्मदास उरकुडा भजगवळी (५०) आणि नीलकंठ रामचंद्र जरादे (४२) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अलीफ सुधाकर गजबे (३०) आणि राहुल माणिक धारणे (३५) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

पोलीस तपास सुरू

मेंडकी पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे गोगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

+