Electricity bill arrears | चंद्रपुरात वीज बिल थकबाकीचा डोंगर

January 17, 2026 by Prakash Hande
Electricity bill arrears

वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला? 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास

Electricity bill arrears : चंद्रपूर: मार्च महिन्यात वीज बिल थकबाकी वसुली मोहिमेला वेग येणार असून, महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी घराघरात जाऊन वसुली करतील. मात्र, मागील काही महिन्यांत वीज कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर महावितरणने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. (Electricity workers attacked)

थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. तरीही, विजेच्या पुरवठ्यासंदर्भात लोक आक्रमक होऊन वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले करत आहेत, हे चिंतेचे कारण ठरत आहे. अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, हल्लेखोरांना दहा वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. Electricity Bill Payment

वीज कर्मचाऱ्यांवरील हल्ले गंभीर गुन्हा

महावितरणचे कर्मचारी हे शासकीय काम बजावत असतात. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणे, सरकारी कार्यालयांची तोडफोड करणे, अथवा शासकीय कामात अडथळा आणणे, हे गंभीर गुन्हे आहेत. अशा प्रकरणांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये कठोर कारवाई करण्यात येते.

चंद्रपूर मनपाच्या पथकाला शिवीगाळ व धमकी, गुन्हा दाखल

कायदेशीर तरतुदी:

  • कलम 353 – शासकीय कामात अडथळा आणल्यास फौजदारी कारवाई
  • कलम 332 आणि 333 – शासकीय कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ल्यासाठी कठोर शिक्षा
  • कलम 504 आणि 506 – कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि गैरवर्तन
  • कलम 427 – कार्यालयात जबरदस्तीने प्रवेश आणि मालमत्तेचे नुकसान
  • कलम 141, 143, 148 आणि 150 – अनधिकृत जमाव जमवणे व गोंधळ घालणे

या गुन्ह्यांसाठी दोन ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

कोट्यवधी रुपयांची थकबाकी

चंद्रपूर जिल्ह्यात वीज ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून, त्यातील मोठा वाटा शेती जोडण्यांचा आहे. सध्या शेतकऱ्यांची चालू बिले माफ झाली असली तरी, थकबाकीची वसुली महत्त्वाची आहे. Chandrapur electricity

महावितरणचे आवाहन: वेळेवर बिल भरा

महावितरणने स्पष्ट केले आहे की, थकबाकी वसुलीसाठी आलेले कर्मचारी केवळ त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरून वीज खंडित होण्याची वेळ येऊ नये, याची खबरदारी घ्यावी. अखंडित वीजपुरवठ्यासाठी वेळेवर बिल भरणे अत्यावश्यक आहे, असे महावितरणने सांगितले आहे.

Leave a Comment

+