Chandrapur protest July 3 । 💥 धर्मगुरूंविरोधात बोलणाऱ्या आमदाराविरुद्ध चंद्रपूर ख्रिश्चन समाज आक्रमक!

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur protest July 3

Chandrapur protest July 3 चंद्रपूर - राज्याच्या राजकारणात सत्ताधारी मंत्री असो कि आमदार सध्या ते विविध जातीधर्माबाबत बेताल वक्तव्य करत सुटले आहे, याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भाजपचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, यांच्यावर कठोर कारवाई करीत आमदारकी रद्द करण्याची मागणी चंद्रपूर ख्रिश्चन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याकरिता ३ जुलै रोजी चंद्रपुरात संत अँड्रयूज चर्च ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर निषेध मोर्च्याचे आयोजन चंद्रपूर जिल्हा पास्टर्स असोसिएशन तर्फे करण्यात येत आहे. Gopichand Padalkar controversial speech

आयटीआय नंतर थेट नोकरी, ७० जणांना मिळाला रोजगार

प्रकरण काय?

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथे ऋतुजा राजगे नावाच्या गर्भवती तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात धर्मांतरासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मशाल मोर्चादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांनी “धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पाद्रींना सैराट करा, आणि जो हे करेल त्याला मी स्वतः ११ लाखांचे बक्षीस देईन” असे विधान केले. या वक्तव्याने ख्रिश्चन समाजात संताप आणि भय निर्माण झाले असून, त्यांनी याला हिंसाचाराला चिथावणी देणारे वक्तव्य ठरवले आहे.

सैराट गेम करा

धर्मगुरूंना ठार मारणाऱ्याला, त्याचा सैराट गेम करणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी सभेत जाहीर केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे धर्मगुरूंची समाजविघातक व्यक्तीकडून हत्या होऊ शकते. त्यामुळे धर्मगुरूंच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास गोपीचंद पडळकर जबाबदार असतील. जनतेतून निवडून आलेला आमदारच अशी बेताल भाषणे करून ख्रिश्चन समाजाबद्दल गरळ ओकत असेल तर त्याला आमदारपदी राहण्याचा अजिबात अधिकार नाही. Christian protest Chandrapur 2025

https://youtu.be/qeug68ldQF4?si=46ps1kpso7Nyq0Ep

राज्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी विविध समाजात तेढ निर्माण करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, काही वाद झाला तर एका समाजाला टार्गेट करण्याचे काम या सत्ताधारी पक्षांकडून केल्या जात आहे, समाजाने विरोध दर्शविला तर माफी मागून प्रकरण शांत केल्या जाते मात्र सरकारतर्फे अश्या बेताल वक्तव्य करणाऱ्या लोक प्रतिनिधींवर कारवाई केल्या जात नाही. सध्या राज्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाज एकजुटीला उभा झाला असून राज्यात आंदोलनाची शृंखला सुरु करण्यात आली असून या श्रुंखलेत चंद्रपुरातील ख्रिश्चन बांधवांतर्फे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्च्यात समाजातील बांधवानी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

+