school alumni reunion । २५ वर्षांनंतर वर्ग पुन्हा भरला! विसापूर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा

January 17, 2026 by Prakash Hande

school alumni reunion

school alumni reunion : विसापूर (ता. बल्लारपूर) – येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सन 1999–2000 व 2000–2001 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा आगळावेगळा स्नेहमिलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि जुन्या आठवणींना उजाळा देत पार पडला.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन माजी मुख्याध्यापक श्री. सुभाष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्री. रामचंद्र पोहणकर होते. शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक श्री. चौधरी, तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून माजी शिक्षक श्री. गोपाल गावंडे, श्री. शत्रुघ्न बावनकुळे, श्री. संतोष मेश्राम, श्री. रवींद्र बंडीवार, श्री. दिनेश वरघणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुनील चौधरी, आणि सौ. मनोरमा खोब्रागडे, श्रीमती शोभा मडावी, श्रीमती नालंदा नळे/गावंडे, सौ. छाया तावाडे/नळे, सौ. पार्वती दुपारे, सौ. रत्नमाला खनके/गिरडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. alumni meet event

चंद्रपूर ते शिर्डी थेट बससेवा सुरु होणार

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन व दीपप्रज्वलनाने झाली. राष्ट्रगीतानंतर सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

माजी विद्यार्थिनी चंदा वैरागडे यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना उपस्थितांची मने जिंकली. "एकेकाळी शालेय स्पर्धांमधील स्पर्धा, शिक्षकांचे रागावणे आणि आजच्या यशस्वी जीवनात त्या आठवणींचा वाटा" या भावना त्यांनी शेअर केल्या.

या स्नेहमिलनाचे आयोजन माजी विद्यार्थ्यांनी WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून केले. जवळपास 70 हून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले. या उपक्रमातून शाळेला रोख स्वरूपात मदतही करण्यात आली. school reunion celebration

alumni meet event

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किशोर वडस्कर आणि सौ. उज्वला भोयर यांनी अतिशय सुंदररीत्या पार पाडले. आभार प्रदर्शन सौ. रेणुका साठोणे यांनी केले. स्नेहमिलनानंतर सर्व उपस्थितांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रमात चेतन वानखेडे, रवी हरणे, तणवीर शेख, मनीषा भोंगळे, सुरेश बावणे, रवी नवले, कामेश मुन, प्रशांत टोंगे, राजू भारशंकर, राजेश थुल, विलास भोयर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. तसेच गावातील सूरज टोमटे, गजानन पाटणकर, विद्या देवाळकर, प्रीतम पाटणकर, विजय इटणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Comment

+