traffic problem in Chandrapur city । चंद्रपूर शहरात जड वाहनांना नो एंट्री?

January 17, 2026 by Prakash Hande

traffic problem in Chandrapur city

traffic problem in Chandrapur city :चंद्रपूर - आज आम आदमी पार्टी चंद्रपूर यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन सादर करण्यात आले. शहरात दिवसेंदिवस वाढणारी जड वाहनांची वाहतूक, त्यातून होणारे अपघात, वाढलेली ट्रॅफिकची समस्या आणि नागरिकांच्या जीविताला होणारा धोका या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले आहे. heavy vehicle ban in city area

चंद्रपुरात अंगावर शहारे आणणारा अपघात

नुकतेच तुकूम येथे २२ वर्षीय युवतीचा जड वाहनाच्या अपघातात मृत्यू झाला. तसेच जनता कॉलेज चौक, वरोरा नाका, बंगाली कॅम्प चौक आदी भागांत देखील याआधी अनेक अपघात घडले आहेत.

अध्यक्ष योगेश गोखरे यांनी सांगितले

"मी विधानसभा निवडणुकीच्या आधी आमदार किशोर जोरगेवार यांना वैयक्तिकरित्या भेटून चंद्रपूर शहरातील जड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची माहिती दिली होती आणि त्यावर उपाय म्हणून रिंग रोड व जड वाहनांवर वेळेची मर्यादा घालावी असे स्पष्टपणे सुचवले होते. पण त्यांनी यावर कोणतीही कृती केली नाही."

"इतकेच नव्हे तर आम आदमी पार्टी चंद्रपूरने याच विषयावर मा. राज्यपालांसोबत देखील अधिकृतपणे चर्चा केली होती आणि शहरासाठी रिंग रोड गरजेचा आहे, हे मांडले होते. पण दुर्दैवाने त्या पातळीवरही याकडे कुठलेही लक्ष देण्यात आले नाही."

https://youtu.be/IhPKmjL9OEA?si=fdj4hqA-FteriwtO

"आज या दुर्लक्षिततेमुळे निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत. आम्ही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहतो. जर प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन छेडेल."

निवेदनातील प्रमुख मागण्या:


✅ शहरात सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान जड वाहनांना प्रवेश बंद करावा
✅ फक्त रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच शहरात प्रवेश परवानगी द्यावी
✅ शहराबाहेर तात्पुरते ट्रक टर्मिनल्स व पर्यायी मार्ग विकसित करावेत
✅ रिंग रोडचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे

ही मागणी संपूर्ण चंद्रपूरकर जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा रस्ता रोको आंदोलन ही आमची पुढील कृती असेल.

निवेदन देतांनी :

एकनाथ हांडेकर चंद्रपूर शिक्षक आघाडी महानगर अध्यक्ष
व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

योगेश गोखरे चंद्रपूर महानगर अध्यक्ष

मयूर राईकवार चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष

राजू कुडे चंद्रपूर युवा जिल्हा अध्यक्ष

तब्बसूम शेख चंद्रपूर महानगर महिला अध्यक्ष

संतोष बोपचे चंद्रपूर महानगर संघटन मंत्री

प्रशांत शिदूरकर चंद्रपूर जिल्हा सचिव उपस्थित होते.

Leave a Comment

+