Chandrapur police attack : चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून आता गुन्हेगारांनी पोलिसांवरच हल्ला करण्याची धमक दाखवली आहे. 7 मार्च रोजी पठाणपुरा गेटच्या आत पिंक पॅराडाईज बार मध्ये दोन पोलीस कर्मचारी बसले होते, त्यावेळी त्यांचा युवकासोबत वाद झाला, वादाचे रूपांतर मारहाणीत झाले, त्यानंतर त्या युवकाने काही जणांना सोबत घेत पोलिसांवर चाकूने हल्ला केला, या हल्ल्यात पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण व समीर चाफले वर सपासप वार केले. या भ्याड हल्ल्यात पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांचा मृत्यू झाला असून, दुसरा पोलीस कर्मचारी समीर चाफले हा गंभीर जखमी आहे.
पठाणपुरा गेट च्या आत असलेल्या एका बारमध्ये झालेल्या वादातून हा हल्ला घडला. मात्र, नेमका वाद कशामुळे झाला, याचा तपास अद्याप सुरू आहे. विशेष म्हणजे, हा परिसर अनेक अवैध हालचालींनी बदनाम आहे, आणि यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Chandrapur murder case
या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते, आरोपीने पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलं असल्याची माहिती पुढे आली. Chandrapur police news
चंद्रपूर शहर आणि परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, गुन्हेगारांची टोळकी कायद्याला धाब्यावर बसवून सर्रास गुन्हे करत आहेत. पोलिसांवरच हल्ले होऊ लागल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण आला असून, आता पोलिसांसाठीही संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे.
या हत्याकांडानंतर गुन्हेगारांना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच पोलिसांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Leave a Comment