अंधाराचा फायदा घेत तो घरात शिरला आणि...

January 17, 2026 by Prakash Hande

crime against women : भद्रावती १० डिसेंबर २०२५ (News३४) - २९ वर्षीय विवाहित महिलेच्या घरी प्रवेश करून मला तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणत त्या महिलेचा हात पकडत महिलेच्या अंगाला स्पर्श करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा भद्रावती पोलिसांनी दाखल केला आहे. (हे वाचा - जटपुरा गेट परिसरात एकाच दिवशी दोन घरफोड्या)

९ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता महिला घरी एकटी होती महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेल्याने संधीचा फायदा घेत भाऊराव उरकांडे ने सदर महिलेच्या घरी प्रवेश करीत दाराची कडी आतून लावली. मला तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणत त्या महिलेचा भाऊराव ने हात पकडला. त्याने तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न सुद्धा केला. crime against women

इतक्यात पीडित महिलेचा पती घरी आला, पटीने दार ठोठावले असता भाऊराव ने घाबरत पळ काढला. या सर्व प्रकाराबाबत महिलेने भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली. पोलिसांनी भाऊराव उरकांडे यांच्यावर कलम ३२९ (४) व ७५ (१) (i) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Leave a Comment

+