Chandrapur Government Medical College fire : चंद्रपूर: शहरातील नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात असलेल्या शापुरजी पालोनजी अँड कंपनीच्या स्टोअरमध्ये बुधवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीची माहिती मिळताच, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने महानगरपालिका अग्निशमन विभागाला पाचारण केले.
अग्निशमन विभागाची दोन वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आग वेगाने पसरत असल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. Shapoorji Pallonji Company fire Chandrapur
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या आगीत कंपनीच्या स्टोअरमधील लाखोंच्या मालसामानाचे मोठे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
Leave a Comment