Rajura electronic meter protest news : राजुरा 27 नोव्हेम्बर (News34) :-- राजुरा शहरातील विविध भागांत लावण्यात येत असलेल्या अन्यायकारक इलेक्ट्रॉनिक मीटरविरोधात अखेर काँग्रेसने कडक भूमिका घेतली असून नागरिकांच्या दबावानंतर विद्युत विभागाने जबरदस्तीने मीटर बसविणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
क्राईम न्यूज : नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत युवकाने माजवली दहशत
स्थानिक नागरिकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्याकडे धाव घेत अन्यायाची माहिती दिली. नागरिकांच्या योग्य हक्कासाठी अरुण धोटे यांनी स्वतः पुढाकार घेत उपकार्यकारी अभियंता, विद्युत उप विभाग, राजुरा कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी विभागीय अधिकाऱ्यांना जाब विचारत अन्यायकारक मीटर तत्काळ मागे घेण्याची मागणी करणारे निवेदनही देण्यात आले. नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर हे आधीच्या मीटर पेक्षा दोन ते तीन पट्टीने अधिक वाढीव बील देत असतात यामुळे गोरगरीब जनतेची पिळवणूक होणार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
काँग्रेसच्या या ठाम भूमिकेनंतर अखेर विद्युत विभागाने नागरिकांना विश्वासात न घेता जबरदस्तीने इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले. या निर्णयाचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लोकशाही मार्गाने लढलेल्या संघर्षाला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. Rajura electronic meter protest news
आंदोलनाच्या वेळी माजी उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ देशपांडे, किशोर बानकर, सय्यद जाहीर, रफीक अन्सारी, अजहर सिद्धिकी यांच्यासह स्थानिक नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Comment