Gadchandur zendi mundi gambling news : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरु आहे, मात्र जिल्ह्यातील गडचांदूर मधील लक्ष्मी टॉकीज परिसरात गडचांदूर (gadchandur) पोलिसांच्या नाकावर टिच्चून सट्टा केंद्र खुलेआम सर्रासपणे सुरु आहे. विशेष म्हणजे news३४ च्या बातमीनंतर २ मे रोजी पोलिसांनी कारवाई केली मात्र ती कारवाई फक्त देखावा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे. Gadhchandur betting racket Laxmi Talkies
घुग्गुस पोलिसांची महत्वपूर्ण कामगिरी, अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या
गडचांदूर हे औद्योगिक नगरी आहे याठिकाणी बाहेरील कामगार रोजगारासाठी येत असतात मात्र तिथे या मजूर व कामगार वर्गाला लुटण्यासाठी सट्टेबाज (Gambling) अलिखित परवानगी घेऊन धंदा सुरु करून बसले आहे. पोलिसांच्या कारवाई नंतर सुद्धा हा सट्टा सर्रासपणे पुन्हा येईन च्या पार्श्वभूमीवर सुरु झाला, याचाच अर्थ पोलिसांची वचक आता गुन्हेगारांवर व अवैध धंद्यावर राहिली नाही असे दिसून येत आहे. Illegal gambling in Chandrapur district

गडचांदूर शहरातील या सट्ट्याच्या धंद्यात काही भागीदार आहे, ज्यामध्ये शेरू, किट्टु, गणेश आणि लल्लू यांचा समावेश आहे. इसाफ बँक जवळ लक्ष्मी टॉकीज असा या सट्टेबाजांचा पत्ता आहे. Gadchandur zendi mundi gambling news
सकाळी व सायंकाळी ओपन व नेट च्या जाळ्यात अलगद अडकून आकड्यांचा खेळ सुरु होतो, कुणाला आकडे लागतात तर कुणाचा क्षणभंगुर होतो, तर कुणी गेम लागला म्हणून त्याठिकाणी उड्या मारत बसतो, झटपट पैसे कमविण्याचे आमिष हे सट्टेबाज नागरिकांना देत आहे.

जिल्ह्यात अवैध धंदे सुरु करण्यापूर्वी व्यावसायिकांना अलिखित परवानगी घ्यावी लागते, त्यासाठी वरिष्ठ ते कनिष्ठ पर्यंत आर्थिक देवाणघेवाण होते, देवाणघेवाण झाल्यावर व्यवसाय करण्याच्या अटी सांगितल्या जातात, त्यानंतर जागा ठरवीत, आकड्यांचा खेळाला सुरुवात होते. गडचांदूरमध्ये सट्टा, झेंडी मुंडी असे खेळ खेळल्या जातात, पण पोलिसांची यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत का बरं होत नसेल? हा एक प्रश्नचं आहे. सट्टेबाज यांच्याकडे अशी कोणती शक्ती आहे कि ते पोलिसांना सुद्धा घाबरत नाही.
Leave a Comment