house burglary fast police action : चंद्रपूर - पती - पत्नी नेहमीप्रमाणे शेतात कामाकरिता गेले मात्र जेव्हा ते घरी परतले त्यावेळी घरातील सामान अस्तव्यस्त दिसले, कपाटातील सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले होते. पोलिसात तक्रार झाली, गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला आणि गावातील ३३ वर्षीय इसमाने चोरी केल्याचे उघडकीस झाले. पोलिसांनी २ दिवसात आरोपीला अटक केली.
चंद्रपूरातून ३० हजार राख्या थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती
चिमूर तालुक्यातील कन्हाळगावात रामदास वाघमारे हे नेहमीप्रमाणे शेतात पत्नीसोबत कामाला गेले होते, सायंकाळी ७ वाजता पती-पत्नी घरी परतले असता घरातील मागचा दरवाजा उघडा दिसल्याने घरात चोरी झाल्याचा संशय बळावला. कपाटातील सोन्याचे दागिने कुठेही दिसून आले नसल्याने रामदास वाघमारे यांनी याबाबत चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचा पंचनामा करीत गोपनीय सूत्रांनी पोलिसांना माहिती दिली कि सदर चोरी हि गावातील ३३ वर्षीय रोशन बबन वाघमारे यांनी केली आहे, पोलिसांनी शहानिशा करण्याकरिता आरोपीला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने रामदास वाघमारे यांच्या घरी चोरी केली असल्याचे कबूल केले. आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळून सोन्याचे दागिने सहित तब्बल १ लाख ४०,००० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chimur Chandrapur jewelry burglary

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात दिनेश लबडे पोलीस निरीक्षक चिमूर यांच्या नेतृत्वात डीबी पथकातील पोलीस कर्मचारी विलास निमगडे, रोहित तुमसरे. सचिन खामनकर व सोनू आणि सचिन साठे यांनी केली.
Leave a Comment