Crime News Marathi | विकायला आला आणि अडकला! चंद्रपुरात सराईत गुन्हेगाराला अटक

January 17, 2026 by Prakash Hande

Crime News Marathi

Crime News Marathi : २ जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अटक करीत ९ दुचाकी वाहन सहित एकूण ४ लक्ष ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. BikeRecovery

चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे साम्राज्य, गडचांदूर बनलं सट्टेबाजांचे हब

चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरी प्रकरणी आरोपीचा शोध घेणे सुरु करीत चोरीचा छडा लावण्याची मोहीम राबवली. ChandrapurCrimeNews

दुचाकी विक्री करीता आला आणि अडकला

यादरम्यान गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली एक इसम विना नंबरची मोटार सायकल बंगाली कॅम्प येथे विक्रीसाठी आणली, सदर इसम ग्राहकाच्या शोधात असताना स्थानिक गुन्हे शाखेने त्या इसमाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपलं नाव ३२ वर्षीय मिलिंद जयभारत डंभारे असे सांगितले, डंभारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

९ दुचाकी जप्त

डंभारे याने पोलीस स्टेशन रामनगर, चंद्रपूर शहर, राजुरा व हिंगणघाट जिल्हा वर्धा एकूण ९ दुचाकी चोरीचे ६ गुन्हे केले असल्याची कबुली दिली. आरोपीकडून वेगवेगळ्या कंपनीच्या ९ दुचाकी वाहन जप्त करीत एकूण ४ लक्ष ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यशस्वी पोलीस पथक

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे व प्रमोद कोटनाके यांनी केली.

Leave a Comment

+