NSUI Chandrapur student fee waiver : चंद्रपूर २३ सप्टेंबर २०२५ : एनएसयूआय प्रदेशाध्यक्ष मा. सागर सालुंखे जी यांच्या निर्देशानुसार तसेच आमचे नेते व मार्गदर्शक मा. रोशन दादा बिट्टू जी यांच्या मार्गदर्शनाखाली, एनएसयूआय चंद्रपूर जिलाध्यक्ष शफक शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
MBBS प्रवेशित विद्यार्थ्यांची आत्महत्या, थक्क करणार कारण
संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी शुल्क व वसतिगृह शुल्क आकारले जात आहे. ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर मोठी आर्थिक जबाबदारी ठरत असून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी वरील सर्व शुल्क माफ करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे आणि कठीण परिस्थितीत सरकार व शिक्षण विभागाने दिलासा देणे ही जबाबदारी असल्याचे या प्रसंगी अधोरेखित करण्यात आले.
या निवेदन प्रसंगी एनएसयूआयचे युवा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये फैजल खान, नावेद शेख, आतिश दुपारे, सौम्या विश्वकर्मा, सुमित चौहान, गणेश यादव, आशीष गावडे, राहुल तापसे, प्रतमेश दाओरे यांचा सक्रिय सहभाग होता.
Leave a Comment