Anti-drug operation in Chandrapur । चंद्रपुरात नशेचं जाळं, मेफेड्रोन विक्री प्रकरणी २४ वर्षीय युवकाला अटक

January 17, 2026 by Prakash Hande

Anti-drug operation in Chandrapur

Anti-drug operation in Chandrapur : चंद्रपूर - चंद्रपूर सारख्या लहान जिल्ह्यात मादक पदार्थाची तस्करी दिवसेंदिवस वाढत आहे, अनेक तरुण या नशेच्या आहारी गेल्याने गांजा सह मेफेड्रोन पावडर हे सहजतेने उपलब्ध होत आहे, विशेष बाब म्हणजे अल्पवयीन मुले, तरुण मुली व महिलांचा सुद्धा या मादक पदार्थ विक्रीमध्ये सहभाग वाढताना दिसत आहे.

चंद्रपुरात दीड किलो गांजा जप्त

चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखा मादक पदार्थविरोधात मोहीम राबवित आहे, या मोहिमेत १८ ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे सरकार नगर मध्ये सापळा रचत २४ वर्षीय युवकाला मेफेड्रोन पावडर विक्री प्रकरणी अटक करण्यात आली.

१ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त

सरकार नगर मध्ये दुचाकी वाहन mh३४ bn ०७५२ ला थांबवित चालकाची झडती घेतली असता २४ वर्षीय सौरभ दुर्वास कसारे राहणार मेजर गेट, वैद्य नगर चंद्रपूर याच्या ताब्यात असलेले ६.०६ ग्राम मेफेड्रोन पावडर जप्त करीत दुचाकी वाहन, मोबाईल व मेफेड्रोन पावडर असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पोलिसांनी आरोप सौरभ वर एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. youth Mephadrone arrest NDPS action

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, नितीन कुरेकार, दीपक डोंगरे व अमोल सावे यांनी केली.

Leave a Comment

+