Warora crime news । चंद्रपूर पोलिसांचा मोठा दणका – वरोऱ्यात गांजासह आरोपी गजाआड!

January 17, 2026 by Prakash Hande
Warora crime news

Warora crime news : होळी सणाच्या पार्शवभूमीवर चंद्रपूर पोलिसांचे अवैध धंद्यावर धाडसत्र मोहीम सुरु आहे. १३ मार्चला वरोरा पोलिसांनी गांजा वनस्पतीचे पाने, फुले व बिया असा एकूण १ किलो ९९२ ग्राम जप्त करण्यात आला, या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

धुलीवंदनाच्या दिवशी दारू प्यालं तर...

१३ मार्च वरोरा पोलीस पेट्रोलिंग करीत असतानां एक इसम टेम्भूर्डा चौकात संशयास्पद रित्या उभा होता, त्या इसमाच्या हातात बॅग बघून पोलिसाना संशय आला. पोलिसांनी त्या इसमाची चौकशी करीत बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये १ किलो ९९२ ग्राम गांजा वसंपत्ती व बिया आढळून आली. Drug smuggling latest news

पोलिसांनी आरोपी प्रफुल किशोर रामटेके ला अटक करीत त्याच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात सपोनि शरद भस्मे, पोउपनि दीपक ठाकरे, पोलीस कर्मचारी संदीप मुळे, विशाल राजूरकर, मोहन निषाद, दिलीप सूर, अमोल नवघरे, मनोज ठाकरे व महेश गावतुरे यांनी केली.

Leave a Comment

+