Bhandak local journalists press club । सामाजिक बांधिलकीसह पुढे सरसावणार! भांदक प्रेस क्लबची नवी टीम सज्ज

January 17, 2026 by Prakash Hande

Bhandak local journalists press club : भद्रावती (२६ ऑगस्ट २०२५) : शहरातील भांदक प्रेस क्लबची महत्वपुर्ण बैठक सोमवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली होती. पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. उपस्थित सदस्यांनी एकमताने कार्यकारिणीची घोषणा केली.

 

अस्वलाचा हल्ला, अस्वलसह एकाचा मृत्यू

या नव्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून सुधीर पारधी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी ईश्वर शर्मा यांच्यावर सोपविण्यात आली. उपाध्यक्षपदी सुनिल पतरंगे, सचिवपदी वतन लोणे, सहसचिवपदी सुनिल बिपटे यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्षपदी अब्बास अजानी यांची निवड करण्यात आली. याशिवाय सल्लागार म्हणून डॉ. यशवंत घुमे व अशोक पोतदार यांची नेमणूक करण्यात आली. सदस्य म्हणून लिमेश माणुसमारे व शंकर डे यांचा समावेश करण्यात आला. press club executive committee 2025

 

पत्रकारांच्या हिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडणार

प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न, अडचणी तसेच पत्रकारांच्या हिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडले जातील असा विश्वास नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पत्रकारांच्या हक्कांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत सकारात्मक उपक्रम राबविण्याचा निर्धार या वेळी नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.पत्रकार संघटनांचे महत्त्व वाढत असताना भांदक प्रेस क्लबची ही नवीन कार्यकारिणी स्थानिक पत्रकारांना बळकटी देईल, असे मत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले.

 

सर्वानुमते निवड झाल्यामुळे संघटनेतील एकजूट अधिक मजबूत झाली असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले.भांदक प्रेस क्लबच्या बैठकीत झालेली ही कार्यकारिणी निवड स्थानिक पत्रकारितेसाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार असून, पुढील काळात पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असा निर्धार नवनियुक्त अध्यक्ष सुधीर पारधी यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

+