बकरी ईदपूर्वी चंद्रपुरात शांतता समिती, जिल्हाधिकाऱ्यांचे ८ महत्त्वाचे निर्देश

May 22, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - पुढील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात बकरी ईद साजरी करण्यात येणार आहेया निमित्ताने जिल्हाभर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावीयासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन कटिबध्द आहेप्रशासनाला सहकार्य करून नागरिकांनीसुध्दा सण आणि उत्सव आनंदात व शांततेत साजरे करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले. (२५ लाख घ्या आणि वाघासमोर जा - डॉ. अभिलाषा गावतुरे यांचं मुख्य वनसंरक्षकांना आव्हान)

 

नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि पेालिस विभागाच्या वतीने आयेाजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्यायावेळी पोलिस अधिक्षक आयुष नोपाणीमनपा आयुक्त अकुनूरी नरेशसहायक पोलिस अधिक्षक गौरव कायंदे पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारीपोलिस निरीक्षकशांतता समितीचे सदस्यमहिला दक्षता समितीचे सदस्यपोलिस पाटील आदी उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्याशहरातील पाणी पुरवठा व वीज पुरवठा खंडीत होणार नाहीयाची संबंधित विभागाने दक्षता घ्यावीसोशल मिडीयावर फेक किंवा निगेटिव्ह मॅसेज दिसला की त्वरीत पोलिस विभाग किंवा सायबर टीमला कळवावेवेळेवर फॅक्ट चेक करावेजेणेकरून अफवा पसरणार नाहीविशेष म्हणजे पुढील काही दिवस चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहेत्यामुळे सकाळी सण साजरा झाल्यावर दुपारी कोणीही विनाकारण बाहेर पडू नयेअसे आवाहन त्यांनी केले.

 

मनपा आयुक्त अकुनूरी नरेश म्हणालेशहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित रहावायासाठी नियोजन करण्यात आले आहेकुर्बानीच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध्‍ करून दिले जाईलसाफसफाई व इतर आवश्यक उपाययेाजना मनपाने केल्याचे त्यांनी सांगितलेकार्यक्रमाचे संचालन पोलिस अंमलदार मंगला घागी यांनी केले.

 

पोलिस प्रशासन सजग – पोलिस अधिक्षक नोपाणी

ईद निमित्त संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त ठेवण्यात आला आहेगोमांसची तस्करी होऊ नयेयासाठी आंतरजिल्हा व आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी पॉईंट्स सुरू करण्यात आले आहेसोशल मिडीयावरील अफवांवर किंवा चुकीच्या पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबरची टीम 24 बाय 7 कार्यरत आहेकाही चुकीचे आढळल्यास पोलिस विभाग किंवा 112 क्रमांकावर त्वरीत माहिती द्यावीजिल्ह्यात बकरी ईद शांततेत साजरी करण्यासाठी पोलिस प्रशासन सजग आहेअशी ग्वाही जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी दिली.

 

नागरिकांनी केल्या सुचना : ईद निमित्त शांतता समितीच्या सदस्यांनी यावेळी प्रशासनाला सुचना केल्यायात 1) विद्युत पुरवठा अखंडीत राहावा 2) पाणी पुरवठा नियमित व्हावा 3) कोणतीही अप्रिय घटना घडू नयेयासाठी चोख बंदोबस्त ठेवावा 4) गर्दीवर योग्यरित्या नियंत्रण ठेवावे 5) असामाजिक तत्व व विघातक लोकांना गर्दीपासून दूर ठेवावे 6) सोशल मिडीयावर अफवा पसरू नयेयासाठी गांभियाने दक्षता घ्यावी 7) शहरातील पार्किंगचे योग्य व्यवस्थापन करावे 8) अवैध होर्डीग्जवर कारवाई करावी.

Leave a Comment

+