Chandrapur drug trafficking case : चंद्रपूर - राज्य ड्रग्ज मुक्त व्हावे यासाठी पोलीस यंत्रणा सध्या विविध मोहिमा राबवित आहे, विशेषकरून चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यात होणाऱ्या अंमली पदार्थाच्या तस्करी व विक्रीवर आळा घालण्याचे प्रयत्न करीत आहे यामध्ये २७ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० ग्राम मेफेड्रोन पावडर सहित दोघांना अटक केली आहे. आरोपीजवळून तब्बल १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चंद्रपुरात गुन्हेगारीचा उद्रेक
झटपट पैसे कमविण्याच्या नादात तरुणाईच्या उंबरठ्यावर असणारी मुले अंमली पदार्थाच्या तस्करीत रमून गेली आहे, या गुन्ह्यात अडकल्यावर पुढे काय यावर विचार न करणारी मुले आपलं भविष्य उध्वस्त करीत आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्याकरिता विविध मोहिमा राबवित आहे. या अनुषंगाने २७ जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे शहरात मेफेड्रोन पावडरची विक्री करणाऱ्या २ युवकांना रयतवारी कॉलोरी येथील निमवाटिका येथे सापळा रचून ताब्यात घेतले. MD powder drug case in Chandrapur
२१ वर्षीय विशाल रत्नाकर भोयर राहणार बगड खिडकी, चंद्रपूर व २२ वर्षीय मोहम्मद फैज अब्दुल राशिद कुरेशी राहणार नुरी चौक बगड खिडकी यांच्याजवळून पोलिसांना २० ग्राम एमडी मेफेड्रोन पावडर आढळून आले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सहित १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केला.

सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, अजित शेंडे, रिषभ बारसिंगे व मिलिंद टेकाम यांनी केली.
Leave a Comment