crime in small Indian villages राजुरा तालुक्यातील सास्ती गावात भरदिवसा थरारक हत्याकांड घडले आहे. शुक्रवार (दि. 21) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आतिश बापू मोतकू (32, रा. सास्ती) याची निर्घृण हत्या करण्यात आली. रामनगर (सास्ती) येथील दोन भावंडांनी लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला जागीच ठार मारले. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. murder cases in rural India
डोळ्यात मिरची पाऊडर टाकत चंद्रपुरात १७ लाखांची लूट
मृतक आतिश याला काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात अटक झाली होती. तो नुकताच बाहेर आला होता. आरोपी त्याच्या हालचालींवर नजर ठेवून होते. त्याच्यावरील रेकी आधीपासून सुरू असल्याची चर्चा असून, तो गावात बाहेर पडताच आरोपींनी त्याचा पाठलाग केला.
चन्ने देशी दारू दुकानाजवळ त्याला पाहताच दोघांनी त्याचा पाठलाग केला. आपला जीव वाचवण्यासाठी आतिश गल्लीत पळाला, मात्र तेथे लपण्यासाठी जागा नसल्याने आरोपींनी निर्दयीपणे लोखंडी रॉडने सपासप वार करून त्याला ठार मारले.
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक (आयपीएस) अनिकेत हीरडे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती चिघळू नये म्हणून दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले.
पोलीस उपजिल्हा अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अमोल कचोरे यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण सास्ती गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
सास्ती गाव वेकोलीच्या खाणपट्ट्यांनी वेढलेले असून येथे अवैध व्यवसायांचे जाळे फोफावले आहे. यापूर्वीही या भागात मारामाऱ्या, गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. इतक्या संवेदनशील भागात असतानाही सास्ती पोलिस चौकी कायम बंद असते, हे विशेष चिंतेचे कारण बनले आहे. violence near liquor shops
सास्ती गावातील देशी दारू दुकान, बिअर बार आणि अवैध धंदे यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. safety issues in rural Maharashtra
राजुरा पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे.
📌 गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलणार का? पोलीस चौकी कायम सुरू होईल का? सास्तीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना होतील का? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे!
Leave a Comment