संविधान काळात भाजप नव्हताच! वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा भाजपकडून फॅक्ट चेक

January 17, 2026 by Prakash Hande

Historical Political Facts : चंद्रपूर ९ जानेवारी - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर M.E.L प्रभागात महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची जाहीर सभा नुकतीच पार पडली. (भाजप उमेदवारांचा प्रचार महिलेने विचारला संतप्त सवाल)

या सभेत बोलत असताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर अनेक टीका केल्यात, त्यांनी सांगितलं की ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माण करत होते त्यावेळी मतदानाचा अधिकार हा श्रीमंतांना किंवा सुशिक्षितांना द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची होती असे त्यांनी वक्तव्य केले.

यावर उत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रलय म्हशाखेत्री यांनी त्यांच्या आरोपांचे खंडन करत सांगितले की,
वडेट्टीवार साहेबांनी केलेल्या आरोपात दिसतंय की वडेट्टीवार साहेबांना त्यांचा अभ्यास वाढवावा लागेल कारण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माण करत होते त्यावेळी त्या काळात भारतीय जनता पक्षच न्हवता,भारतीय जनता पक्षाची स्थापना ही १९८० ला झाली आणि संविधान निर्मितीचे काम हे १९४६ ते १९४९ या कालावधीत पूर्ण झाले. Historical Political Facts

बाबासाहेबांनी म्हटलं होतं,काँग्रेस हे जळतं घर आहे ,हे का नाही सांगत वडेट्टीवार साहेब असेही वक्तव्य त्यांनी केले….
म्हणून त्यांचे आरोप हे बिन बुडाचे आणि कमी अभ्यासाचे आहे त्यांना अभ्यास वाढवावा लागेल असा आरोप भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रलय म्हशाखेत्री यांनी केला.

Leave a Comment

+