Rajura political rally Chandrapur । मत चोरांच्या भुलथापाला, आमीशाला बळी पडू नका : माजी आमदार चटप व धोटे यांचे आवाहन

January 17, 2026 by Prakash Hande

Rajura political rally Chandrapur : राजुरा ३० नोव्हेम्बर २०२५ (News३४) :-- कांग्रेस, शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष यांच्या संयुक्त पुढाकाराने स्थापन झालेल्या नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुणभाऊ धोटे तसेच प्रभाग क्र. १ ते १० मधील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आझाद चौक आणि जवाहर नगर येथे भव्य जाहीर सभा घेण्यात आल्या. दोन्ही सभांना तसेच कार्नर सभांना हजारो स्वाभिमानी नागरिकांची उसळलेली गर्दी पाहता, राजुरा शहरातील जनतेचा विकासाभिमुख कल अधिक ठळकपणे दिसून आला.

सेलिब्रेटी : सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू चंद्रपुरात

सभेत बोलताना शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी नागरिकांना जोरदार आवाहन केले. मत चोर, बनवेगीरी करणारे, रेती-कोळसा चोरीतून शहराला लुटणारे, परवानगी करात भ्रष्टाचार करणारे, आणि आमचे उमेदवारही चोरी करून घेऊन जाणारे पार्सल लोक पुन्हा फसवणुकीच्या भुलथापात पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आमीशाला बळी पडू नका, असे आवाहन नेत्यांनी केले.


राजुराच्या शाश्वत विकासासाठी आणि शहरातील तरुणांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी नगरविकास आघाडीच एकमेव सक्षम पर्याय असल्याचे स्पष्ट करत चटप-धोटे म्हणाले, आम्ही दोन्ही माजी आमदार कोणाला घाबरून एकत्र आलो नाही. राजुराच्या जनतेच्या हितासाठी, शहराचा विकास अधिक भक्कम करण्यासाठी आणि सध्याच्या बेबंदशाहीला पूर्णविराम देण्यासाठी एकत्र आलो आहोत. तसेच भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार भाजपच्या आमदारांनाच सक्षम वाटत नसल्याने ते जीथे तिथे मला पाहून मत द्या असे आवाहन करीत असून तसे न झाल्यास नधी मिळणार नाही असा खोटा कांगावा करीत फिरत आहेत. मात्र आम्ही दोन्ही आमदार आणि अरूण धोटे यांनी अनेक वर्षे केंद्रात, राज्यत आमचे सरकार नसतांना आणि पालकमंत्री आपले नसतांनाही राजुराचा विकास करून दाखविला आहे. या पुढेही शाश्वत विकासासाठी झटत राहु असा विश्वास व्यक्त केला.


यावेळी सभे पूर्वी स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंचावर नगर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अरूणभाऊ धोटे, सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार यांचेसह काँग्रेस, शेतकरी संघटना आणि मित्र पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

+