Mobile Shop Theft : वरोरा - तालुक्यातील लारा मोबाईल शॉपमध्ये काही दिवसांपूर्वी दुकानाचे शटर तोडून अज्ञात आरोपींनी लॅपटॉप व रोख असा एकूण १ लक्ष २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता, गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी सखोल तपास करीत १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आरोपीला अटक केली. (भद्रावतीच्या पिरली मध्ये रंगला जुगार, पोलिसांची धाड)
लारा मोबाईल शॉपचे शटर तोडत २ लॅपटॉप व रोख ८० हजार असा एकूण १ लक्ष २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला, याबाबत शंकर क्षीरसार यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच तपास सुरु करण्यात आला, तपासात आरोपीचा काही थांगपत्ता लागत नव्हता. पोलिसांनी वरोरा शहरातील दुकान व घरांचे जवळपास १०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
गोपनीय माहितीच्या आधारे वरोरा शहरातील हर्षद पेटकर याला ताब्यात घेण्यात आले, हर्षल ने आपल्या साथीदारांसह लारा मोबाईल शॉप मध्ये चोरी केली होती. आरोपीजवळून चोरी केलेले दोन लॅपटॉप, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात सपोनि शरद भस्मे, दिलीप सूर, संदीप मुळे, महेश गावतुरे व सौरभ कुलथे यांनी केली.
Leave a Comment