Maharashtra police crime crackdown : गुन्हेगारी क्षेत्रात तरबेज व पोलिसांच्या अटकेपासून मागील २० वर्षांपासून पसार असलेला ६० वर्षीय आरोपी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. सदर आरोपी चोरी केलेले सोन्याचे दागिने चंद्रपुरात विक्री करण्याकरिता आला असता त्याला अटक करण्यात आली.
चंद्रपुरात क्रिकेट सट्टेबाजांचा धुमाकूळ, यंदा पोलीस धरपकड करणार का?
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशाने जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा सतत कारवाई मोहीम राबवित आहे, या मोहिमे दरम्यान चंद्रपूर शहरात एक इसम सोनीचे दागिने विकणेकामी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. Chandrapur police crime news
माहितीच्या आधारे पोलिसांनी ६० वर्षीय सुरेश महादेव कामरे राहणार पुनवट तालुका वणी जिल्हा यवतमाळ ला अटक करण्यात आली. आरोपी कामरे जवळ २ लाख ६१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
आरोपी सुरेश कामरे यांनी नुकतीच पोलीस स्टेशन तळोधीच्या हद्दीत चोरी केल्याची बाब पोलिसांसमोर कबुल केली. आरोपीने आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती मध्ये १, वरोरा ३, सावली १, मुल १, तळोधी ५ व नागभीड तालुक्यात १ घरफोडी अश्या एकूण १२ घरफोड्या केल्या अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली. १२ घरफोडी मधील तब्बल १९ लक्ष १० हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.
आरोपी सुरेश कामरे हा मागील २० वर्षांपासून घरफोडी गुन्ह्यात सक्रिय असून तो आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही, चोरीसाठी आरोपी हा ग्रामीण भागातील घराना लक्ष्य करीत होता. २० वर्षात त्याने अनेक गुन्हे केले मात्र चंद्रपुरात दागिने विकण्याकरिता आला असता याठिकाणी तो फसला. Criminal arrested after 20 years

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मूमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल कचोरे . यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोउपनि सुनील गौरकार, पोलिस कर्मचारी धनराज करकाडे, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महंतो, प्रफुल गारघाटे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे,दिनेश अराडे व मिलिंद टेकाम यांनी केली.
Leave a Comment