मुल पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश तस्करी; एक आरोपी फरार

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur cattle smuggling : चंद्रपूर, २७ डिसेंबर : स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावर मुल पोलीस स्टेशन अंतर्गत नांदगाव येथे नाकाबंदी करून अवैध गोवंश वाहतुकीचा धंदा उधळून लावला आहे. पिकअप वाहन क्र. एमएच-३४-बीझेड-९१५२ ताब्यात घेऊन चालक स्वप्नील प्रल्हाद कुलमेथे (वय ३२, रा. येरगाव, ता. पोंभुर्णा) आणि विजय खुशाल बट्टे (वय २७, रा. घडोली, ता. गोंडपिपरी) या दोन आरोपींना गुन्हे शाखेने पकडले. वाहनातील आठ गोवंश जनावरांना सुरक्षिततेसाठी प्यार फाउंडेशन, छोटा नागपूर येथे दाखल करण्यात आले असून, जप्त मालाची अंदाजे किंमत सहा लक्ष साठ हजार रुपये आहे. Chandrapur cattle smuggling (साडेआठ लाखांचे कर्ज आणि वसूल केले ३१ लाख)

या कारवाईत पोलिसांनी आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासासाठी मुल पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध मुल पोलीस स्टेशन अप. क्र. ६१९/२०२५ अंतर्गत कलम ११(१)(घ)(ड)(च)(ज) भा.प्रा.क्रू.वा.प्र.अ. १९६०, कलम ५(अ), ९, ११ म.प्रा.सं.अ. १९७६ (सुधारित २०१५) आणि कलम ३२५, ३(५), ४९ बीएनएस २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरार आरोपी फैयाज रा. करीमनगर, तेलंगणा)चा शोध सुरू आहे, सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Leave a Comment

+