BJP Chandrapur new city president : चंद्रपूर - चंद्रपूर महानगर भाजपला नवा अध्यक्ष मिळाला असून माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे, काही दिवसांपूर्वी राज्यातील भात अध्यक्षांच्या निवडीची यादी जाहीर झाली होती मात्र काही ठिकाणी स्थानिक वाद असल्याने अध्यक्षपद जाहीर करण्यात आले नव्हते.
चंद्रपूर भाजपमध्ये दोन आमदारांमध्ये चढाओढ सुरु असल्याने अध्यक्षपद जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र भाजपने वेळ लावला, आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यामध्ये आपल्या समर्थकांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील होते, त्यामुळे अध्यक्षपद निवड प्रक्रिया लांबली.
मात्र आज महाराष्ट्र भाजपने यादी जाहीर केली असून त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भाजपच्या अध्यक्षपदावर हरीश शर्मा यांची पुनर्नियुक्ती तर चंद्रपूर महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या जागी माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी निवड केली. सुभाष कासनगोट्टूवार हे आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक आहे. तर माजी अध्यक्ष हे सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक आहे. Subhash Kasangottuwar BJP leader

लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर शहरातील भाजपचे प्रदर्शन निराशाजनक राहिले, विधानसभा निवडणुकीत सुद्धा तीच अवस्था होती, मात्र आमदार जोरगेवार यांच्या लोकप्रियतेमुळे ते भाजपमधून निवडून आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपचे प्रदर्शन अत्यन्त निराशाजनक राहिले होते. येणाऱ्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लागणार असल्याने त्यापूर्वी भाजपने नवी राजकीय खेळी करीत अध्यक्षपदांमध्ये मोठे फेरबदल केले आहे. Subhash Kasangottuwar public support
सुभाष कासनगोट्टूवार हे भाजप पक्षात मागील अनेक वर्षांपासून सक्रिय आहे, त्यांचं जनसंपर्क कार्यालय बघून आमदार यांच्या कार्यालयात जितकी गर्दी नसते त्यापेक्षा जास्त गर्दी कासनगोट्टूवार यांच्या जनसंरक कार्यालयात असते, त्यांच्याजवळ कार्यकर्ता व सामान्य जनतेची मोठी फळी आहे. भाजप पक्षाला कासनगोट्टूवार यांचा मोठा फायदा होणार हे नक्कीचं. विशेष बाब म्हणजे चंद्रपूर महानगरातील प्रत्येक सामान्य कार्यकर्ता कासनगोट्टूवार यांच्याशी जुडलेला आहे. त्यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. विशेष बाब म्हणजे चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदावर बदल झाल्याने एका गटात ख़ुशी तर एका गटात गम पसरले आहे.
Leave a Comment