Pink Paradise bar sealed । पोलिसाच्या हत्येनंतर कारवाईचा झटका – ‘पिंक पॅराडाईज’ बारला टाळे

January 17, 2026 by Prakash Hande

public demand Pink Paradise bar sealed

शहरातील इतर बारवरही नजर?

Pink Paradise bar sealed : चंद्रपूर शहरात 7 मार्च रोजी पिंक पॅराडाईज बार मध्ये दिलीप चव्हाण नामक पोलीस कर्मचाऱ्याचा क्षुल्लक वादातून खून झाला होता, यानंतर पोलीस प्रशासन आक्रमक झाले आणि खुनासारखी गंभीर घटना व वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांच्या मागणीवरून पिंक पॅराडाईज बार पोलीस प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले.

7 मार्च रोजी बार पुढे पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली होती, (Police officer murder in Chandrapur
) आधी बार मध्ये काही युवकांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांचा वाद झाला त्या वादातून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली होती.

चंद्रपुरात क्रिकेट सट्टा नेटवर्क चालविणाऱ्यांवर आता होणार मोठी कारवाई

या घटनेनंतर पोलीस विभाग खळबळून जागा झाला आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 142 (2) च्या अधिकारातून लोकहिताच्या दृष्टीने सदर बार सील करण्यात आले. (Maharashtra bar license rules) काही दिवसांपासून या बार समोर बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे नागरिकांना मार्गावरून जाण्यासाठी गैरसोय होत आहे. सोबतच बार मध्ये पार्किंग ची व्यवस्था नाही ही बाब अनुज्ञपती चे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे हि कारवाई करण्यात आली. Police action on bars

खुनासारखी गंभीर घटना घडल्यावर पोलिसांनी आपल्या अधिकाराचा वापर केला हे चांगलं पाऊल पोलिसांनी उचललं पण शहरात असे अनेक बार आहे जे वेळेचे बंधन पाळत नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, त्या बार वर सुद्धा पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा एकाला एक तर दुसऱ्याला दुसरा न्याय होणार. काही वर्षांपूर्वी रघुवंशी कॉम्प्लेक्स मधील एका बार मधून व्यसनाधीन युवकाने पार्किंग मध्ये युवकाच्या अंगावरून वाहन नेले होते.

हॉटेलमध्ये बिर्याणी खात आहात? मग त्या बिर्याणीमध्ये अळी तर नाही? चंद्रपुरात घडला अळीमय बिर्याणीचा प्रकार

शहरात असे अनेक बार आहे जे वेळेचे बंधन पाळत नाही, काही बार ला स्थानिक नागरिकांनी अनेकदा विरोध केला मात्र त्यावेळी पोलीस आपल्या अधिकाराचा वापर करीत नाही. अनेक जागी नको त्या ठिकाणी आज बार व देशी दारूचे दुकान लागले आहे, त्या ठिकाणाहून महिला जाण्यास घाबरतात त्याबाबत विरोध होतो पण तेव्हाही पोलीस आपल्या अधिकाराचा वापर करीत नाही.

प्रशासन जर आपल्या नियमांनी चालायला लागणार त्यादिवशी उल्लंघनाचा खेळ कायमचा बंद झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांसोबत हा प्रसंग घडला आणि नियमांचा वापर करीत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी करायलाच हवं गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी जे प्रयत्न पोलीस विभाग करतात जर तेच प्रयत्न बे लगाम बार चालकांना नियमांचा पाठ शिकविण्यासाठी करावा लागला तर ते करायलाच हवे अन्यथा असे गुन्हे घडतच राहणार.

Leave a Comment

+