भानापेठमध्ये भाजप उमेदवारांना नागरिकांचा घेराव; व्हिडीओ व्हायरल

January 17, 2026 by Prakash Hande

Public Anger on Politicians: चंद्रपूर १० जानेवारी - चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून शहरातील १७ प्रभागात राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यात व्यस्त आहे, मात्र अश्यातच शहरातील जटपुरा प्रभागात माजी नगरसेवकांविरुद्ध नागरिकांचा रोष काही दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान बघायला मिळाला होता. आता पुन्हा भानापेठ प्रभागात असाच प्रकार समोर आला आहे. (चंद्रपूर जिल्ह्यात शिंदेसेनेला कांग्रेसने दिला धक्का)

चंद्रपूर शहरातील प्रभाग क्रमांक ११ भानापेठ मधून भाजप उमेदवारांना जनतेच्या रोषाला सामोरे गेल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे, या व्हिडिओमध्ये भाजप उमेदवार माजी नगरसेवक संजय कंचर्लावार, सूरज पेद्दुलवार, आशा आबोजवार, व माला पेंदाम बगडखिडकी परिसरात प्रचार करीत असताना नागरिकांनी घेराव घालत त्यांना प्रश्न विचारला.

https://youtube.com/shorts/x7CazoPjaf0?feature=share

निवडणूक आली कि प्रचार करायला येतात त्यानंतर याभागात भटकत सुद्धा नाही, आमच्याकडे पाण्याची समस्या, कचऱ्याची विल्हेवाट अश्या अनेक समस्या आहे मात्र आपण इकडे ढुंकूनही बघत नाही, नागरिकांनी माजी नगरसेवक संचय कंचर्लावार यांच्यावर समस्यांचा मारा केला, अचानक झालेल्या या प्रकाराने चारही उमेदवार चांगलेच गोंधळून गेले होते.

निवडणूक आली कि उमेदवार जोमात प्रचार करतात मात्र निवडणूक जिंकल्यावर नगरसेवक अनेक भागात जात नाही त्यामुळे असे प्रकार पुढेही वाढणार असून मतदार राजा आता जागा होत आहे असेच या प्रकारातून दिसत आहे.

Leave a Comment

+