Shiv Sena Kingmaker : चंद्रपूर - राज्याचा निकाल एकीकडे तर चंद्रपूर शहराचा निकाल एकीकडे अशी परिस्थिती मनपा निवडणूक निकालात दिसली, राज्यातील बहुतांश महानगरपालिका भाजपच्या ताब्यात गेली मात्र चंद्रपूर शहर मनपा मध्ये कांग्रेस मोठा पक्ष तर भाजप क्रमांक २ वर गेला. कांग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी शिवसेना ठाकरे पक्षाची गरज लागणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेत सत्तेची चावी शिवसेनेकडे गेली आहे. (महापौर पदावरून कांग्रेस पक्षात वादंग सुरु)
चंद्रपुरात शिवसेना-वंचित आघाडी मध्ये युती झाली आणि त्यांनी बहुतांश जागेवर आपले उमेदवार उतरविले, निवडणूक निकालात शिवसेना तर वंचित आघाडीला जागा मिळाल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – वंचित बहुजन आघाडी युतीने या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावत आपली ताकद ठळकपणे सिद्ध केली आहे. Shiv Sena Kingmaker
भाजपा असो वा काँग्रेस — सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडेच पाहावे लागणार आहे. महानगरपालिकेतील सत्तेची गणिते ठरवणारा निर्णायक घटक म्हणून शिवसेना पुढे आली आहे. या यशामागे शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या प्रभावी नेतृत्वाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. संघटन बांधणी, योग्य रणनीती आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलेली ऊर्जा यामुळेच शिवसेना आज या निर्णायक स्थानावर पोहोचली आहे, असे राजकीय विश्लेषक मानतात.
या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ‘हुकमी एक्का’ ठरला असून, महापौर पदाचा निर्णय घेण्यातही पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेचा महापौर कोण होणार, हे आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठरवणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
एकूणच, चंद्रपूरच्या राजकारणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली ताकद, राजकीय पकड आणि निर्णायक क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली असून, आगामी काळात शहराच्या सत्ताकारणावर शिवसेनेची छाप अधिक ठळकपणे दिसणार, यात शंका नाही.
Leave a Comment