ganja drugs : 2 जानेवारीला रात्री 10 वाजताच्या सुमारास जिवती तालुक्यावरून 2 इसम गांजा घेऊन दुचाकीने राजुरा शहराच्या दिशेने निघाले होते, वाटेतच पोलिसांनी दोघांना अटक केली, यावेळी पोलिसांनी 13 किलो 835 ग्राम गांजा पकडला.
जिल्ह्यातील शेवटचा तालुका जिवती व राजुरा येथे मागील काही वर्षात अंमली पदार्थाच्या तस्करी मध्ये वाढ झाली होती, त्यावेळी पोलिसांनी या तस्करीवर नियंत्रण आणले होते.
नायलॉन मांजाची छुप्या पध्दतीने विक्री, एलसीबीची धाड
नव्या वर्षात पुन्हा अंमली पदार्थाची तस्करी काहीं छुप्या पध्दतीने करीत आहे अशी माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. Crime news
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राजुरा हद्दीतील भेंडवा फाटा येथे सापळा रचून बसले होते, रात्री 10 वाजताच्या सुमारास दोघेजण मोटारसायकल वर पोत्यात गांजा भरून येत होते, दोघे त्याठिकाणी आल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने छापा मारत दोघांना ताब्यात घेतले.
यावेळी 50 वर्षीय देवराव माणिकराव केसगीर व 50 वर्षीय दिनकर शंभू कुळसंगे दोघेही राहणार जिवती यांना अटक करीत त्यांच्या जवळील पोत्यात 13 किलो 835 ग्राम गांजा व दुचाकी वाहन असा 2 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेला गांजा आरोपी राजुरा येथे विक्री करणार होते.
दोन्ही आरोपीवर कलम 8(क), 21(ब), ii (ब), 29 NDPS प्रमाणे राजुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी किशोर वैरागडे, दीपक डोंगरे, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार, दिनेश अराडे यांनी केली.
Leave a Comment