Aditya Mahotsav in Chandrapur । विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान, आरोग्य शिबीर… आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचा चंद्रपूरमध्ये उत्सवी थाट!

January 17, 2026 by Prakash Hande

Aditya Mahotsav in Chandrapur

Aditya Mahotsav in Chandrapur : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस १३ जून रोजी चंद्रपूर युवासेनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आदित्य महोत्सव साजरा केला. आरोग्य शिबीर, रक्तदान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. aditya thackeray birthday

जुनी पेन्शन योजना लागू करा, खासदार धानोरकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

कार्यक्रमाच्या शृंखलेत सर्वप्रथम मूल रोड मार्गावरील संत जगनाडे महाराज सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमात करिअर मार्गदर्शक व प्रमुख वक्ता आकाश दादा कडुकर प्रमुख पाहून म्हणून सोमय्या पॉलिटेक्निकचे सहसंचालक पियुष आंबटकर, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघात दुर्घटनेत मृत पावलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन युवासेना सहसचिव व युवतीसेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

दहावी-बारावीनंतर काय?

आकाश कडुकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि, आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपले अव्वल स्थान गाजवायचं असेल तर या धावत्या युगाला आधी समजून घेणे गरजेचे आहे. दहावी-बारावीनंतर काय हा प्रश्न अनेकांना पडतो, आपली आवड ज्या क्षेत्रात आहे ते क्षेत्र आपण निवडलं तर त्यामध्ये आपण आपलं स्थान क्रमांक १ वर नक्कीच गाजवू शकतो.

youth sena career guidance camp in chandrapur

आयोजित कार्यक्रमात दहावी व बारावी च्या ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा शिल्ड व प्रमाणपत्र देत सत्कार करण्यात आला.

गंजवार्ड प्रभाग क्रमांक ११ मध्ये युवासेनेतर्फे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५१ नागरिकांनी रक्तदान केले व १०० च्या वर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. youth sena career guidance camp in chandrapur

aditya thackeray birthday
https://youtu.be/IhPKmjL9OEA?si=DUSMdjzWJTRwLPAi

आयोजित कार्यक्रमात अधिवक्ता अजित पांडे, युवतीसेना उपजिल्हाधिकारी धनश्री हेडाऊ, उपजिल्हाप्रमुख यशपाल कमटम, युवासेना तालुकाप्रमुख सुरज शेंडे, युवासेना शहरप्रमुख शाहबाज शेख, शहर समन्वयक प्रज्वल आडे, उपशहर प्रमुख संघदीप रामटेके, उपतालुकाप्रमुख विवान रामटेके, उपशहर प्रमुख स्वप्नील पाटील, श्रीकांत दडमल, शहबाज सैय्यद, पिंटुदादा बलवीर, पृथ्वी ठाकूर, सलमान शेख, सुनील राजकुमार, युवराज शेख, सागर गभणे, अभिजित वागडे, अंकित काटकर, रितिक रायपुरे, पराग, विशाल सहारे, शुभम आले, आर्यन, उमेश मस्के आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

+