Bhadrawati municipal council Election । भद्रावती नगरपरिषद; नगराध्यक्षपदासाठी तीन शिवसैनिक आमनेसामने

January 17, 2026 by Prakash Hande

Bhadrawati municipal council Election

Bhadrawati municipal council Election : चंद्रपूर/भद्रावती २१ नोव्हेम्बर (News३४) - चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व एक नगरपंचायतीकरिता उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे, २५ नोव्हेम्बर नंतर उमेदवार प्रचारकार्याला सुरुवात करणार आहे. या रणधुमाळीत रंजक निवडणूक हि भद्रावती नगर परिषदेची होणार आहे, भद्रावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र पक्ष विखुरल्यावर चित्र पालटले. आता नगराध्यक्ष पदाच्या निवडीत शिवसेनेचे उमेदवार आमनेसामने आले आहे.

Read Also : जनता कॅरिअर लॉन्चर च्या वसतिगृहात विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, विद्यार्थ्याने केली आत्महत्या

दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी भद्रावती नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता अबाधित राखण्यास ताकद पणाला लावली होती. राज्यात सत्तांतर झाले, शिवसेना पक्षात बंड झाल्याने पक्षाची दोन भागात फाळणी झाली. भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, कांग्रेस व भाजप पक्षातून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिवसैनिकाला मिळाली. आता आजी-माजी शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात या निवडणुकीत सामोरा जाणार आहे. निवडणुकीत जिंकणार तो शिवसैनिकचं. Bhadrawati municipal council Election

अनेक वर्षे भद्रावती नगर पालिकेच्या अध्यक्षपदी विराजमान असलेले अनिल धानोरकर यांनी शिवसेना पक्षातून सत्ता मिळवली. दिवंगत खासदार धानोरकर कांग्रेस पक्षात सामील झाले, त्यांच्या निधनानंतर भद्रावती-वरोरा विधानसभेच्या उमेदवारीसाठी अनिल धानोरकर यांनी प्रयत्न केले मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या भावाला विधानसभेचे तिकीट दिले. प्रवीण काकडे यांचा पराभव झाला. आता नगरपालिकेच्या निवडणुकीत कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र त्या आशेवर पाणी फेरण्यात आले. अखेर अनिल धानोरकर भाजप पक्षात सामील झाले आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली. त्यांचा राजकीय कार्यकाळ शिवसेना व्हाया वंचित आघाडी व्हाया भाजप.

अनिल धानोरकर भाजपात गेले आणि त्यांच्यामुळे भाजपात बंड झाले, भाजप शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश करीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली. २ महिन्यापूर्वी भाजपात येत पक्षाने अनिल धानोरकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. पक्षाने कार्यकर्त्यांच्या मेहनतीला मान दिला नाही. त्यामुळे नामोजवार कांग्रेस पक्षात सामील झाले. विशेष बाब म्हणजे सुनील नामोजवार हे शिवसैनिक, शिवसेनेत असताना ते भद्रावती नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ हा शिवसेना व्हाया भाजप व्हाया कांग्रेस असा आहे. Bhadrawati municipal council Election

नगराध्यक्षपदाचे तिसरे दावेदार हे प्रफुल चटकी, तीनदा नगरसेवक, उपाध्यक्ष पद, प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असलेले प्रफुल चटकी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवीत आहे. शिवसेना शिवसेनेतून वेगळी झाल्यावर त्यांनी शिंदेसेनेसोबत जाण्याचे ठरविले. लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे, नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात चटकी माजी नगराध्यक्षाना कडवे आव्हान देत आहे. Bhadrawati municipal council Election

सुनील नामोजवार, अनिल धानोरकर व प्रफुल चटकी तिघेही शिवसैनिक एकमेकांविरुद्ध नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत आहे, तिघांनी आम्ही निवडून आल्यावर शहराचा चांगल्या विकासाचा दावा केला आहे. भद्रावती नगरपरिषदेला देशात स्वच्छतेत नंबर एक करणार अशी प्रतिक्रिया तिघांनी News३४ सोबत बोलताना दिली आहे. याशिवाय सुनील नामोजवार यांच्या पाठीशी खासदार प्रतिभा धानोरकर, अनिल धानोरकर यांच्या पाठीशी माजी खासदार हंसराजी, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे व प्रफुल चटकी यांच्यापाठीशी शिंदेसनेचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे व जिल्हाप्रमुख नितीन मत्ते आहे. कुणाच्या नेतृत्वाला जनता कौल देणार हे २ डिसेम्बर रोजी कळेल. तूर्तास इतकेचं.

Leave a Comment

+