Brahmapuri police arrest thief : ब्रह्मपुरी: १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) ब्रह्मपुरी शहरात एकाच रात्रीत घरफोडी आणि चोरी करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपीला ब्रह्मपुरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे स्टेशनजवळील पेठ वॉर्ड परिसरात झालेल्या या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपीने एकूण ६४,००० रुपये किमतीचा ऐवज चोरला होता, जो पोलिसांनी पूर्णपणे हस्तगत केला आहे.
दिनांक १३/१०/२०२५ च्या रात्री पेठ वॉर्ड, ब्रह्मपुरी येथे चोरीच्या दोन घटना घडल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव आणि पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित शोधमोहीम सुरू झाली. Police recovery stolen goods Brahmapuri
सपोनिरी मनोज खडसे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पो.हवा. योगेश शिवणकर, मुकेश गजबे, अजय कटाईत, पो.शि. इरशाद शेख, निलेश तुमसरे, स्वप्निल पळसपगार, चंदू कुलसंगे आणि वशिष्ठ रंगारी यांचा समावेश होता.
पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेत असताना एका अनोळखी संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याची ओळख श्रीकांत उर्फ बोटतुट्या राजू जुनारकर (वय २२, रा. चंद्रपूर) अशी पटली. हा आरोपी चंद्रपूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळताच त्याची झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान, दोन्ही गुन्ह्यांमधील चोरलेले सोन्याचे दागिने आणि मोबाईल त्याच्याकडे मिळून आले. पोलिसांनी एकूण ६३,००० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीला दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली असून, पुढील तपास पो.हवा. मुकेश गजबे आणि अजय कटाईत करत आहेत.
ब्रह्मपुरी पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे चोरीच्या घटनांना त्वरित आळा बसला असून, नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
Leave a Comment