चंद्रपुरात महापौर कुणाचा?; कांग्रेस पक्षात कलह, भाजपला महापौर पदाची संधी?

January 19, 2026 by Prakash Hande

Chandrapur Mayor Race : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत कांग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे, मतदारांनी कुणालाही स्पष्ट बहुमत दिले नाही. या निवडणुकीत कांग्रेस मित्रपक्षाला ३० जागा, भाजप मित्रपक्ष २४ जागा, शिवसेना-वंचित ८ जागा, बसपा १, अपक्ष २ व एमआयएम १ जागा मिळाल्या आहे. कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या निवडणुकीत अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या. सुरुवातीला तिकीट वाटपावरून अनेक निष्ठावंतांना पक्षाने नारळ देत नव्या चेहऱ्याना संधी दिली. कांग्रेसने एकप्रकारे राजकीय जुगार खेळला मात्र ते या राजकीय जुगारात यशस्वी झाले. भाजपने अनेकांवर अन्याय केला एबी फॉर्मचे चोरीचे आरोप लागले, त्यामुळे बंडखोरांनी भाजपचे नुकसान केले. (चंद्रपुरात महापौर पदावरून वादंग)

येत्या काही दिवसात महापौर पदाचे आरक्षण निघणार आहे, तत्पूर्वी आपला महापौर बसावा यासाठी कांग्रेस पक्षाने तयारी केली आहे, भाजपने सुद्धा यंदा महापौर आमचा अशी प्रतिक्रिया दिल्याने राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे मनपामध्ये सत्तेसाठी ३४ मॅजिक फिगर आवश्यक आहे, हा आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्षांना शिवसेना-वंचित ची साद अत्यंत गरजेची आहे. हि सर्व परिस्थिती येण्यापूर्वीच कांग्रेसच्या गोटात अंतर्गत कलह सुरु झाला आहे. वडेट्टीवार-धानोरकर गट महापौर पदावरून पुन्हा समोर येत आपल्या समर्थकांना त्या पदावर बसविण्यासाठी एकमेकांविरुद्ध संघर्ष करीत आहे. Chandrapur Mayor Race

कांग्रेसच्या भांडणाचा राजकीय फायदा भाजपला होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत असून वडेट्टीवार व धानोरकर यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांना एकत्र केले आहे, सध्या कांग्रेसच्या नगरसेवकांचे दोन गट तयार झाले आहे, यामधील काही नगरसेवकांचा गट भाजपच्या संपर्कात आहे, असे झाल्यास चंद्रपूर मनपामध्ये भाजपचा महापौर होणार यात काही शंका नाही, त्यासाठी दोन्ही पक्षांना शिवसेना-वंचित आघाडीच्या नगरसेवकांची गरज भासणार नाही. कांग्रेस पक्षात सुरु असलेल्या भांडणाचा जर भाजपला फायदा झाल्यास कांग्रेस आपला महापौर मनपात बसवू शकणार नाही. तशी शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास चंद्रपुरातील सुजाण मतदारांच्या मतांचा अपमान नगरसेवक करणार असे चित्र चंद्रपूरच्या राजकारणात निर्माण झाले आहे.

Leave a Comment

+