village protest for road : राजुरा तालुका (ता. २३ जून) : पालगाव ग्रामस्थ मागील अडीच ते तीन वर्षांपासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडे रस्त्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहेत. चिखल आणि खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदने देऊन तसेच कंपनी प्रशासनाशी चर्चा करूनही रस्ता प्रश्न सुटला नाही. याच पार्श्वभूमीवर ५ मे रोजी ग्रामस्थ आक्रमक होत कंपनीच्या मुख्य कार्यालयात आंदोलन केले होते.
चंद्रपुरात वाळू माफियांची मुजोरी, वाळूने भरलेला ट्रक तहसीलदार समोर पळविला
कंपनी प्रशासनाने पाठ फिरविल्याने ग्रामस्थांनी कार्यालयाचा प्रवेशद्वार बंद करून ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनास राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. स्वतः दोन दिवस आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांनी पुढाकार घेतला होता. त्या आंदोलनानंतर कंपनी प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते की ३० मेपर्यंत अल्ट्राटेक ते पालगाव रस्त्याचे काम सुरू केले जाईल.
मात्र ३० मे तारीख उलटून गेली तरी प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झाले नाही. कंपनीकडून केवळ टोलवाटोलवीची उत्तरे मिळू लागली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून आजपासून आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात नांदा फाटा येथील कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता कामासाठी पुन्हा ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली आहे. rural road development issues
पालगाव हे गाव अल्ट्राटेक कंपनीने दत्तक घेतलेले असून कंपनीची खाणसुद्धा गावालगतच आहे. अशा परिस्थितीतही रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी गावकऱ्यांना आंदोलन करावे लागणे हे दुर्दैव म्हणावे लागेल.
Leave a Comment