‘कमळ बघ’ विधानावर जोरगेवारांचा पलटवार, वडेट्टीवारांवर खोचक टीका

January 17, 2026 by Prakash Hande

Political war of words : चंद्रपूर ९ जानेवारी - “किशोर कमळ बघ, सुधीर कमळ बघ” असे शब्द आमदार विजय वडेट्टीवार उच्चारले होते. याच वक्तव्याचा संदर्भ घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी काल झालेल्या प्रचार सभेत विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका करत प्रतिउत्तर दिले. (जटपुरा गेट प्रभागात भाजपच्या प्रचारात महिला संतप्त, व्हिडीओ व्हायरल)

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांची तिकिटे कापण्यात आल्याने पक्षात नाराजी निर्माण झाली असावी. त्याच नाराजीचा परिणाम म्हणून ते वारंवार ‘कमळ बघ, कमळ बघ’ असे बोलत असावेत. कदाचित या निवडणुकीत मतदारांनी कमळाकडेच पाहावे, असा अप्रत्यक्ष सल्लाच त्यांनी जनतेला दिला असावा, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भविष्याचा विचार करूनच वडेट्टीवार यांच्या मुखात आता कमळ बसले आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे ते आणि आम्ही कमळच पाहणार. मात्र, तुम्हीही पंजा सोडून कमळाकडे लक्ष दिले, तर घुग्घूसमध्ये ओढवलेली नामुष्की पुन्हा होणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
घुग्घूस नगर परिषदेतील उपाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला होता, एकमेकांचे चेहरे हे पाहत नव्हते असे ते म्हणाले तसेच चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील गटबाजी याकडे लक्ष वेधत आमदार जोरगेवार यांनी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षावरही टीका केली. Political war of words

काँग्रेस पक्ष सध्या अंतर्गत मतभेद आणि नाराजीने ग्रासलेला असून त्याचे प्रतिबिंब त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यांतून दिसून येत असल्याचे ते म्हणाले. भाजप व महायुती विकासाच्या मुद्द्यावर एकजुटीने निवडणुकीला सामोरे जात असून, जनता कोणाच्या पाठीशी आहे हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल, असा विश्वासही आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

+