construction equipment distribution policies | तालुका स्तरावरच बांधकाम साहित्य वाटप करा; अन्यथा आंदोलन – मिनलताई आत्राम यांचा इशारा

January 17, 2026 by Prakash Hande

construction equipment distribution policies

construction equipment distribution policies : भद्रावती: महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना सुरक्षा व आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात येते. सध्या हे साहित्य चंद्रपूर जिल्ह्यात एमआयडीसी केंद्रातून वाटप केले जात आहे. मात्र, ऑनलाईन पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे मागील काही दिवसांपासून हे साहित्य मिळणे बंद आहे. त्यामुळे मजूर व कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. construction safety equipment suppliers

चंद्रपुरात तापमानाचा पारा वाढतोय, प्रशासनाने सुचविले उपाय

यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देत इशारा दिला की, बांधकाम साहित्याचे वाटप प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर करण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडले जाईल.

कामगारांचे हाल, प्रशासनाचा हलगर्जीपणा

कामगारांना साहित्य वाटपासाठी अनेकदा एमआयडीसीमध्ये बोलावले जाते, मात्र नियोजित तारखेलाही साहित्य मिळत नाही. परिणामी, मजूर दोन-दोन दिवस तिथेच थांबतात. याठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. यामुळे कामगारांचे मोठे हाल होत आहेत. अधिकारी वर्गाच्या मनमानीमुळे हा प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तालुका स्तरावरच वाटप करण्याची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मजूर एमआयडीसी केंद्रावर येऊन साहित्य घेतात. मात्र, साहित्य उपलब्ध नसल्याने निराश होऊन परतावे लागते. यामुळे त्यांचा रोजगार बुडतो आणि आर्थिक नुकसान होते. जर प्रत्येक तालुक्यातच बांधकाम साहित्याचे वाटप केले गेले, तर मजुरांना मोठा दिलासा मिळेल.

तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन

या संदर्भात मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनाही निवेदन देण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी आणि त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांनी दिला आहे.

17 Comments

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

3 months ago

खूप छान मॅडम

Leave a Comment

+