Power restoration । "पाण्यात बुडालं गाव… पण वीज आली वेळेत! महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा धाडसी पराक्रम"

January 17, 2026 by Prakash Hande

Power restoration during flood conditions : चंद्रपूर, ११ जुलै, २०२५: महावितरणचे कर्मचारी दररोज आपल्या जीवाची पर्वा न करता, विशेषतः पावसाळ्यात, जोखमीची कामे करत असतात. बुधवार आणि गुरुवारी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते, ज्यामुळे वीजपुरवठ्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता युद्धपातळीवर काम करत, खंडित झालेला वीजपुरवठा काही तासांतच सुरळीत केला आणि ग्राहकांकडून कौतुकाची थाप मिळवली.

 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाचे निकाल जाहीर

गावाभोवती पुराची परिस्थिती असताना, सर्वत्र पाणीच पाणी साचलेले असताना, मानवी गरजांपैकी एक महत्त्वाची गरज असलेली विद्युत व्यवस्था सुरू राहणार की नाही, हा नागरिकांच्या मनातील एक मोठा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत वीज येणारच नाही, असे नागरिक गृहीत धरतात, कारण या पुराच्या पाण्यात जर विद्युत पुरवठा खंडित झाला, तर आपला जीव धोक्यात घालून तो सुरळीत कोण करणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो. 

 

 

परिस्थिती कशीही असो, महावितरणचे कर्मचारी अशा परिस्थितीतही नागरिकांना अंधारात न ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि पुराच्या परिस्थितीतही जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करतात. अशीच एक घटना गेल्या दोन दिवसांत गांगलवाडी वीज वितरण केंद्रात घडली आहे.

 

बोटीच्या साहाय्याने कर्मचारी पोहोचले

दिनांक ९ आणि १० जुलै, २०२५ रोजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्याखाली आलेल्या विद्युत व्यवस्थेला सुरळीत करण्याचे काम पूर्ण केले. बोटीच्या साहाय्याने पुराच्या ठिकाणी जाऊन बंद झालेली विद्युत वाहिनी कापून, उर्वरित गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.

 

Risky duty by electricity board workers

महावितरणच्या गांगलवाडी शाखेचे अधिकारी श्री. दिनेश हनवते (सहाय्यक अभियंता) आणि कर्मचारी श्री. बोंडेजी (मुख्य तंत्रज्ञ), श्री. राकेश मलोडे (वरिष्ठ तंत्रज्ञ), श्री. आकाश नखाते (वरिष्ठ यंत्रचालक), श्री. बारेवाड (यंत्रचालक), श्री. रोहित करंजीकर (तंत्रज्ञ), श्री. सूरज खोब्रागडे (बाह्यस्त्रोत यंत्रचालक), श्री. नागदेवते (बाह्यस्त्रोत यंत्रचालक), श्री. सचिन चहांदे (बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ) आणि अन्य गांगलवाडी वीज वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे हा विद्युत पुरवठा सुरळीत केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Comment

+