constipation remedies : आजच्या धावपळीच्या जीवनात आणि बदलत्या आहारशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य झाली आहे. पण जेव्हा याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर होऊ लागतो, तेव्हा वेळीच सावध होणे गरजेचे असते. आहारतज्ज्ञ दीपशिखा जैन यांनी नुकत्याच एका इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे अशा ४ नैसर्गिक पदार्थांची माहिती दिली आहे, जे नॅचरल लॅक्सेटिव्ह (Natural Laxative) म्हणून काम करतात आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात.
रात्रभर भिजवलेले ४ ते ५ काळे मनुके किंवा 'ड्राय प्लम्स' बद्धकोष्ठतेवर अत्यंत प्रभावी ठरतात. यामध्ये सॉर्बिटोल (Sorbitol) नावाचे नैसर्गिक घटक असते, जे शौचास साफ होण्यास मदत करते.
दिवसभरात किमान २ ते ३ वेळा भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. भाज्यांमध्ये विद्राव्य (Soluble) आणि अविद्राव्य (Insoluble) फायबर मोठ्या प्रमाणात असते. हे फायबर मल मऊ करते, ज्यामुळे ते शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया सुलभ होते.
अनेकांसाठी हे आश्चर्यकारक असू शकते, पण ब्लॅक कॉफीमधील कॅफीन मोठ्या आतड्याच्या स्नायूंना उत्तेजित करते. यामुळे 'गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स' सक्रिय होतो आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत मिळते.
ड्रॅगन फ्रूट आणि हिरवी कीवी या दोन्ही फळांमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असते. ही फळे केवळ शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढत नाहीत, तर पचनक्रिया वेगवान करून बद्धकोष्ठतेपासून आराम देतात.
महत्वाची टीप: जर हे नैसर्गिक उपाय करूनही तुम्हाला आराम मिळत नसेल, तर हे शरीरातील खनिजांची कमतरता किंवा थायरॉईड सारख्या अंतर्गत समस्यांचे लक्षण असू शकते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Leave a Comment