नागरिकांनो लक्ष द्या! चंद्रपूर पोलिसांचे आवाहन

January 19, 2026 by Prakash Hande

Operation search missing kids : चंद्रपूर - राज्यात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता होतात, त्यामध्ये काही आपल्या घरी पोहोचतात तर काहींना आपलं जीवन एकांतवासात जगावे लागते, मात्र महाराष्ट्र पोलीस हरविलेल्या मुलांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी ऑपरेशन शोध मोहीम १४ राबवित आहे. (चंद्रपुरातील बंद दुकानात दारूचा साठा)

हरविलेल्या मुलांसाठी महाराष्ट्र पोलीस २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑपरेशन शोध मोहीम १४ राबवित आहे, या मोहिमेत हरविलेली मुले शोधत त्यांना आपल्या घरी पोहोचविण्याचे काम पोलीस विभाग करणार आहे.

या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले कि, आपल्या परिसरात रेल्वे स्थानक, बस स्थानक,रस्त्यावर भक मागणारी मुले अथवा कचरा गोळा करणारी मुले व धार्मिक स्थळे, रुग्णालय, हॉटेल्स व दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणरी मुले आपल्या राहत्या घरून निघून येऊन तिथे वास्तव्य करीत असल्याची माहिती किंवा हरविलेल्या इसमांबाबतकाही माहिती असल्यास याबाबत चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या व्हाट्सअप क्रमांक ७८८७८९०१०० किंवा ११२ वर माहिती द्यावी. 

Leave a Comment

+