चंद्रपूरात बंद दुकानात १.४० लाखांची अवैध दारू जप्त

January 18, 2026 by Prakash Hande

City Police Action : चंद्रपूर - १७ जानेवारीला शहरातील विठ्ठल मंदिर वार्डात बंद दुकानात अवैध दारू साठा शहर पोलिसांना आढळून आला, पोलिसांनी तब्बल १ लक्ष ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. (सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ४० वर्षांपासून लढा)

१७ जानेवारीला गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली कि, विठ्ठल मंदिर भागातील एका बंद दुकानात दारूचा अवैध साठा ठेवण्यात आला आहे, माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी विठ्ठल मंदिर वॉर्डातील तेजस बंडू वांढरे यांच्या घराजवळ पाहणी करून घराच्या बाजूला असलेल्या बंद दुकानाची झडती घेतली.

पोलिसांनी घेतलेल्या झडती मध्ये विदेशी दारू रॉयल स्टॅग ४८ निपा १८० एमएल , विदेशी दारू रॉयल स्टॅग ९० एमएल ८०० निपा व देशी दारू रॉकेट संत्रा कंपनीच्या ९० एमएल च्या ४०० निपा असा देशी विदेशी दारूचा एकूण अवैध साठा किंमत १ लक्ष ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. City Police Action

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि कोलटें, पोउपनि निकोडे, पोलीस कर्मचारी संजय धोटे, सचिन बोरकर, जावेद सिद्दीकी, इम्रान शेख, भावना रामटेके, निकेश ढेंगे, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, प्रफुल भैसारे व निलेश ढोक यांनी केली.      

Leave a Comment

+