Wcl Workshop theft case : वेकोलि बल्लारपूर मधील वर्कशॉपच्या भिंतीला होल पाडून अज्ञातांनी डबल टेंडन्ट गेअर पंप व इतर भंगार असा एकूण ५ लाख ७२ हजार रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपीना अटक केली आहे.
बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेकोलिच्या वर्कशॉप मध्ये चोरांची नजर पडली आणि त्यामधील लोखंडी साहित्यांची धाडसी चोरी करण्यात आली. यासाठी आरोपींनी एखाद्या चित्रपटासारखी कामगिरी करीत वर्कशॉपच्या भिंतीला होल पाडत त्यामधील महागड्या लोखंडी वस्तू २ मग टेंडन्ट गियर पंप आणि भंगार चा माल चोरून नेला. double tandem gear pump theft
चंद्रपुरातील घुग्गुस मध्ये अतिशय संतापजनक प्रकार
याबाबत सुरक्षा व्यवस्थापकाने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, बल्लारपूर पोलिसांनी कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याबाबत तपास सुरु करीत अज्ञात आरोपी व चोरी गेलेल्या मालाचा शोध सुरु केला.
पोलिसांनी या चोरी प्रकरणात २० वर्षीय श्रीराज संग्राम बहुरिया राहणार सरदार पटेल वॉर्ड बल्लारपूर व २२ वर्षीय करण इंदू निषाद राहणार रामनगर सस्ती राजुरा याला अटक केली. आरोपीसोबत इतरही साथीदार होते अशी माहिती पोलिसांना तपासात प्राप्त झाली. stolen scrap metal recovery
दोन्ही आरोपीनी चोरी केलेला मुद्देमाल वेकोलि वर्कशॉप च्या मागील भागात असलेल्या झुडपात लपून ठेवला होता. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, पोलीस कर्मचारी आनंद परचाके, रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, मिलिंद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, नासिर सय्यद, अनिता नायडू यांनी केली.
Leave a Comment