red chilli market price today । "गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारी मिरची, स्वतःच रडली!"

January 17, 2026 by Prakash Hande

red chilli market price today

चंद्रपूरच्या शेतकऱ्यांचे संकट – मिरची उत्पादकांना मोठा फटका

red chilli market price today : चंद्रपर : (01 एप्रिल 2025) लाल मिरचीला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. पारंपारिक पिकाऐवजी शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत. परंतु खर्च जास्त आणि उत्पन्न् कमी होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची उत्पादक संकटात सापडले आहेत. सध्या भाव पडल्याने लाल मिरची झाडालाच आहे. तोड्याचा खर्च शेतकरऱ्यांना परवडणारा नसल्याने लाल मिरची झाडालाच आहे. मिरचीचातोडा करायचा कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. Chandrapur Mirchi Sheti

चिमूर हादरले, विहिरीजवळ झोपला सकाळी मृतदेहचं आढळला


चंद्रपूर जिल्ह्यात धानपिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे. परंतु परंपरागत काळातपासून धानाचेच उत्पनादन घेत असल्याने शेतकरी नेहमीच संकटात सापडत आहे. त्यामुळे पारंपारीक पिकाऐवजी नवनवीन पिकाचे लागवड करण्यास शेतकरी पुढे येत आहे.धानासह कापूस, सोयाबीन, मिरची व बागायती पिकांकडे शेतकरी वळलाआहे. विशेष म्हणजे राजूरा, कोरपना, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी या परिसरात कापूस, सायोबीन, मिरची व बागायती पिकांची लागवड केली जात आहे. या वर्षात राजूरा, कोरपना सह जिल्ह्यात सुमारे बाराशे हेक्टरमध्ये मिरची पिकाची लागवड करण्यात आली आहे. Mirchi Bazar Bhav Mahiti

सध्या मिरचीचा एक तोडा संपला आहे तर दुसरा तोडा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. परंतु तोडा होण्याच्या अगोदरच मिरची उत्पादक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातून लाल मिरचीची निर्यात नागपूर सह अन्य राज्यात होते. परंतु अचानक भाव पडल्याने मिरची उत्पादक संकटात सापडला आहे. पहिल्या तोड्यात लाल मिरचीला 10 हजारापर्यंत भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिला तोडा आटोपून घेतला. त्यानंतर दुसऱ्या तोड्याची तयार सुरू असताना अचानक भाव पडले. फक्त् 5 ते 7 हजारावर आलेत. त्यामुळे मिरचीचा दुसरा तोडा करायचा कि नाही असा प्रश्न मिरची उत्पादकांना पडला आहे. red chilli cultivation cost per acre


लागवड केल्यानंतर इतर पिकांपेक्षा मिरचीची विशेष काळजी घेतली जाते. या पिकाला किडींचा जास्त धोका असतो. त्यापासून वाचविण्यासाठी शेतकरी महागडी औषधी खरेदी करून फवारणी करतात. बुरशीजन्य किडींचा धोका हा नेहमीच असल्याने शेतकरी विशेष काळजी घेत असतात. शिवाय हंगामभरही मशागत करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात यावर खर्च होतो. मिरचीच्या तुलनेत अन्य पिकांना भाव जास्त नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक हलाखीची होत आहे. त्यामुळेच शेतकरी मिरची सारख्या नगदी पिकाकडे वळत आहे.


मिरचीचा तोडा करण्याचा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे भाव पडल्याने लाल मिरचीचा तोडा करायची कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तोड्या अभावी शेतकऱ्यांच्या बागांमध्ये लाल मिरची झाडालाच दिसून येत आहे. प्रत्येक वेळी गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणणारी लाल मिरची यावेळी स्वत:च झाडाला लाल होत आहे. पडलेल्या भावाने उसळी घेतली नाही तर लाल मिरची उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. red chilli farming profit


“दरवर्षी मी मिरचीची लागवड करतो. हे नगदी पीक असून लाल मिरचीला भाव चांगला मिळतो. मात्र यावर्षी सुरूवातीपासून लाल मिरचीचे भाव पडले आहेत. या वर्षी पहिला तोडा आम्ही 10 हजार प्रती क्विंटल प्रमाणे विकला. दुसऱ्या तोडा तोडण्याची वेळ आली आहे मात्र भाव 4 ते 5 हजार वर आले आहे. त्यामुळे मिरची लागवडीचा खर्चही निघणार नसल्यामुळे झाडाला असलेली लाल मिरची तोडायची की नाही असा प्रश्न आमच्या समोर आहे. ”
: संतोषकुमार पावडे, शेतकरी बिबी (कोरपना)


Leave a Comment

+