Factory worker death : कोरपना २९ डिसेंबर :- ५ ते ६ दिवसापासून घरी न आलेल्या कामगाराचा कापसाच्या ढिगाऱ्यात दबून मृत्यू झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. सदर घटना जेवरा फाटा येथील विदर्भ जिनिंग परिसरात मृतकाच्या मृतदेहाची वास सुटल्यांनतर लक्षात येताच उजेडात आली. (चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक, भाजपची यादी जाहीर होणार)
मृतकाचे नाव संतोष मरावी वय अंदाजे ३० वर्ष असून राहणार बजाक जि डीडोरी, राज्य मध्यप्रदेश येथील रहिवासी असून मृतक कामगार हा त्याच्या पत्नीसह जिनिंग मध्ये राहत असल्याची माहिती असून त्यांच्यासह १० ते १२ लोकांचा समूह देखील कामासाठी त्या ठिकाणी राहत असल्याची माहिती पुढे आली आहे.
सदर घटनेची माहिती कोरपना पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाव घेत कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेह काढताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोरपना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. Ginning Factory Accident
एकीकडे जिनिंग मध्ये कामगार मागील आठवड्याभऱ्यात गायब असताना त्याची हजेरी गैरहजरी याबाबत निष्काळजीपना, लक्षात घेता संबधित जिनिंग व्यवस्थापनावर सद्दोष मनुषवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या कुटुंबातून होत असून त्या कामगाराला न्याय मिळावा अशी मागणी होत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Leave a Comment