नोकरीच्या बदल्यात पक्षप्रवेश? चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा खळबळजनक दावा

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur political news : चंद्रपूर १९ डिसेंबर २०२५ (News३४) - निवडणूक जवळ येताच नेत्यांचे दल बदलणारे कार्यक्रम सुरु होतात. अनेक वर्षे एका पक्षात काम केल्यावर सत्ताधारी पक्षात जाण्याची अचानक इच्छा मनात निर्माण होते, मात्र जुन्या पक्षाने तुम्हाला काय दिल? ते विसरून स्वतःचे हिट जोपासण्यासाठी नवी वाटचाल अनेक नेते आजही करीत आहे, असाच एक पक्षप्रवेश चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवशी पार पडला. भाजप कार्यालयात शिवसेना ठाकरे युवासेनेचे विभागीय पदाधिकारी व सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी भाजपात प्रवेश करीत शिवसेना पक्षाला धक्का दिला. मात्र जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी बेलखेडे हे कर्ज फेडण्यासाठी गेले असल्याचा खळबळजनक दावा केलायं.

१७ डिसेंबर रोजी भाजपचे नवनियुक्त कार्यालयात आमदार जोरगेवार यांच्या उपस्थितीत सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी प्रवेश केला, बेलखेडे यांनी भाजप प्रवेश पूर्वी शिवसेना स्थानिक नेतृत्वात गंभीर आरोप केले. ते म्हणाले कि पक्षांतर्गत सुरु असलेली दडपशाही व गटबाजी मुळे पक्षात मी प्रामाणिक काम केले मात्र बळजबरीने निर्णय लादणे, धमकावणे व दबाव टाकणे असे प्रकार अनेकदा माझ्यासोबत घडले त्यामुळे या सर्व बाबीला कंटाळून पक्षाचा राजीनामा दिला. Chandrapur political news (हे हि वाचा - चंद्रपुरात मनपा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरु)

बेलखेडे यांच्या आरोपावर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी उत्तर देत खळबळजनक दावे केले, ते म्हणाले की निलेश बेलखेडे यांचे आरोप चुकीचे आहे, पक्षाने बेलखेडे यांना युवासेना जिल्हाप्रमुख, युवासेना विभागीय सचिव व सिनेट सदस्य पदी विराजमान केले, पक्षाने त्यांच्यासाठी खूप केले, भाजप प्रवेश हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय होता, नुकतेच जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपची सत्ता बसली.

नव्या भरत्या झाल्या त्या भरती प्रक्रियेत बेलखेडे यांच्या पत्नीला नोकरी मिळाली, भाजपच्या या उपकाराचे कर्ज फेडण्यासाठी बेलखेडे यांनी रवी शिंदे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला. पक्षाने जर बेलखेडे यांना साथ दिली नसती तर त्यांनी पक्षातील विविध पदावर मजल मारली नसती. ते आपल्या उपकाराचे कर्ज फेडण्यासाठी भाजपात गेले आणि आरोप आमच्या करीत आहे. तो त्यांचा पोरकटपणा या आरोपावरून स्पष्ट होते.

Leave a Comment

+