Ghugus water supply project Amrit 2.0 : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) - घुग्घुस शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवा जीवदान मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने केंद्र पुरस्कृत ‘अमृत 2.0 अभियान’ अंतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकूण 93.98 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शासनाचा निर्णय नगर विकास विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे घुग्घुस शहराला शुद्ध, स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Also Read : चंद्रपुरात रस्ता दुभाजकावरून माजी नगरसेवक भिडले

भेटीनंतर बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले घुग्घुससाठी अमृत 2.0 योजनेतून मिळालेला निधी हा ऐतिहासिक निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. या निर्णयामुळे घुग्घुस शहराचा पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल आणि शहराच्या विकासाला गती मिळेल. मुख्यमंत्री यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांना प्राधान्याने गती देण्याचे आश्वासनही दिले आहे. आगामी काही महिन्यांत प्रकल्पाच्या कामांना सुरुवात होऊन नागरिकांना याचा थेट लाभ मिळणार असे ते म्हणाले.
Leave a Comment