बचत गटाचे पैसे हिसकावले, गुन्हे शाखेच्या हाती लागला कोब्रा व जल्लाद

January 22, 2026 by Prakash Hande

Chandrapur Robbery : चंद्रपूर - महिला बचत गटाचे ४२ हजार रुपये बँकेत जमा करण्याकरिता निघालेल्या बचत गट अध्यक्षाच्या पर्स दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला, याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपीना अटक केली. आरोपीकडून जबरी चोरी केलेले पैसे जप्त करण्यात आले. (चोरांना पकडण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी ओलांडली सीमा)

२० जानेवारीला सावली तालुक्यातील ज्योतिबा महिला बचत गट व दुर्गा बचत गटाच्या अध्यक्षा ४२ वर्षीय कविता दुमाजी बालदलवार ह्या गटाचे ४२ हजार रुपये बँकेत जमा करण्यासाठी जात असताना दोन अज्ञात इसमांनी दुचाकीने येत बालदलवार यांचा पर्स हिसकावून नेला. महिलेने आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत ते इसम पळून गेले.

याबाबत सावली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली, सदर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला, गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर व उपविभाग पथकांनी तांत्रिक पद्धतीने तपास करीत ३१ वर्षीय गोपाल उर्फ कोब्राभाई जीवन मालाकार राहणार शामनगर बंगाली कॅम्प चंद्रपूर व २२ वर्षीय आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख राहणार फुकटनगर चंद्रपूर यांना ताब्यात घेण्यात आले.

दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, २४ तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरी प्रकरणाचा छडा लावत चोरी गेलेले ४२ हजार रुपये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत बचत गट अध्यक्ष कविता बालदलवार यांना परत देण्यात आले, पैसे मिळाल्यावर फिर्यादी महिलेने सुटकेचा निःश्वास घेतला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सुरेंद्र महतो, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, चेतन गज्जलवार, हिरालाल गुप्ता, प्रफुल गारघाटे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार व सुमित बरडे यांनी केली.  

Leave a Comment

+