Chandrapur Rebel Candidates : चंद्रपूर (२९ डिसेंबर २०२५) - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस शिल्लक असल्याने भाजप व कांग्रेसने अद्यापही उमेदवारांची यादी जाहीर न केल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीवर पडला आहे. भाजप कडे उच्छुक उमेदवारांची मोठी फौज आहे, जर तिकीट मिळाली नाहीतर मोठ्या प्रमाणावर पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने उर्वरित पक्ष बंडखोरांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे पक्षांची यादी जाहीर झाली नाही. (भाजप उमेदवारीवरून नेत्यांमध्ये खडाजंगी)
भाजपात आमदार मुनगंटीवार-जोरगेवार वाद असल्याने दोघांनाही आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवून द्यायची आहे, याबाबत भाजपने चंद्रपूर मनपाची उमेदवार निश्चित केले आहे, काही क्षणात भाजपची यादी जाहीर होण्याची शक्यता असून आज सर्व उमेदवारांना AB फार्मचे वाटप होणार आहे.
तिकीट नाकारलेल्या भाजप पक्षाच्या बंडखोरांची वाट कांग्रेस सह उर्वरित पक्ष AB फॉर्म तयार करून बघत आहे. आज यादी जाहीर झाल्यावर उर्वरित पक्ष आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करतील, ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची चांगलीच धांदल उडणार आहे. कांग्रेस पक्षात वाद नसताना सुद्धा त्यांनी उमेदवारांची यादी जाहीर न केल्याने पक्षातील इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. Chandrapur Rebel Candidates
पक्षात कसलीही बंडखोरी होऊ नये यासाठी उमेदवारांच्या यादीवर प्रमुख पक्षांनी सस्पेन्स ठेवला मात्र इच्छुकांनी अगोदरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवला आहे आता वाट आहे AB फॉर्म ची, पक्षाची उमेदवारी मिळाली नाहीतर दुसऱ्या पक्षाचा AB फॉर्म घेत उमेदवारी दाखल करणार असा प्रण उमेदवारांनी केला आहे. आज उमेदवारांना AB फॉर्मचे वाटप होणार आहे, यादी जाहीर न करता अशी शक्यता आहे.
Leave a Comment