अजय सरकार पुन्हा अपक्ष रिंगणात

January 17, 2026 by Prakash Hande

Ajay Sarkar Chandrapur : चंद्रपूर - 30 डिसेंबर ला मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षात अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या.


विशेष बाब म्हणजे चंद्रपूर कांग्रेस व भाजपने अद्यापही उमेदवारांची अधिकृत यादी घोषित केलेली नाही. भाजपात आमदार मुनगंटीवार-जोरगेवार यांच्या वादामुळे अनेक निष्ठवंतांच्या तिकीट कापल्या गेल्या आहे. यामुळे आज भाजप गोटात मोठा राजकीय गोंधळ व संताप बघायला मिळाला.


वर्ष 2017 मध्ये बंगाली कॅम्प प्रभागातून अपक्ष निवडून आलेले अजय सरकार यांनी भाजपात प्रवेश केला होता, सरकार हे मुनगंटीवार समर्थक होते, यामुळे त्यांची तिकीट कापल्या गेली, आज आमदार जोरगेवार यांनी अजय सरकार च्या उमेदवारीला विरोध दर्शविला, त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचा आरोप करीत त्यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली. जोरगेवार म्हणाले की सरकार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. Ajay Sarkar Chandrapur

माजी नगरसेवक अजय सरकार यांच्या उमेदवारीला ब्रेक लागल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरकार यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, सरकार म्हणाले की वर्ष 2017 मध्ये मी अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती, त्यावेळी मी भाजप व कांग्रेस पक्षाच्या उमेदवाराला हरविले, आजही तीच परिस्थिती आहे मात्र त्याला न घाबरता मी पुन्हा तोच इतिहास घडवीत निवडणूक जिंकणार.

चंद्रपुरातील विविध प्रभागात भाजपने 2-2 एबी फॉर्म वाटले असून त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Comment

+