Sindewahi crime । दहशतीचा डाव उधळला! सिंदेवाहीत तलवार घेऊन फिरणारा तरुण अटकेत

January 17, 2026 by Prakash Hande

Sindewahi crime update June 17 2025 : सिंदेवाही, दि. १७ जून २०२५: सिंदेवाही शहरात दि. १७ जून २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी एका तरुणाला धारदार तलवारीसह अटक केली. शिवराज सुनील उटलवार (वय २४, रा. विद्यानगर कॉलनी, सिंदेवाही) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने अंधाराचा फायदा घेऊन शहरातील पानटपरी जवळ घातपात करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात तलवार घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

बल्लारपूर शहरात युवकाच्या घरून तलवार जप्त

आरोपीला अटक

सिंदेवाही पोलिसांना पहाटे ५:०० ते ५:४५ वाजण्याच्या दरम्यान पेट्रोलिंग करताना ही घटना निदर्शनास आली. आरोपी शिवराज उटलवार याच्याविरुद्ध भादंवि कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा सह कलम १२२ मपोका अन्वये अप क्रमांक २१३/२०२५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, सिंदेवाही पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

https://youtu.be/qeug68ldQF4?si=RPLSc15SyFbDt9cI

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली स.फौ. चंद्रभान सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Leave a Comment

+